कडाक्याच्या थंडीत वाढली हुरड्याची रंगत; चुलीवरच्या जेवणासाठी गावाकडे धूम

मनोहर घोळसे
Friday, 4 December 2020

बच्चेकंपनी आनंदाने खेळू बागडू लागली आहे. ग्रामीण भागात महिला व कृषी क्षेत्रात कष्ट करतात. परंतु आजच्या नव्या पिढीला शेती गावाकडच्या पारंपारिक पद्धती हे सारे माहीत नसते. त्यामुळे आम्हाला गावाकडली लोककला व येथील परंपरेचे दर्शन घेऊन प्रत्यक्ष शेतीतील कामाचा अनुभव होत असल्याचे मत गाव व शेतीपासून दूर गेलेल्या महिला भगिनी गावाकडे आल्यानंतर व्यक्त करतात.

सावनेर (जि. नागपूर) : लॉकडाऊनमुळे शहरात घराबाहेर पडणे कठीण झाले होते. आता शिथिलता आली असली तरी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे लागते. त्यामुळे शहरी महिला मोकळा श्वास घेण्यासाठी आता गावातल्या मातीकडे वळू लागल्या आहेत. दवभरल्या थंडीसोबत शेतातला हुरडा, चुलीवरचे जेवण व ताजा भाजीपाला आणि फळांचा आस्वाद घेण्याकडे शहरवासींची पावले वळू लागली आहेत.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी झालेल्या लॉकडाऊनच्या काळात शहरी भागातील लोकांवर घरातच डांबून राहण्याची आलेली वेळ, यातच सणासुदिला, लग्नकार्याला व काही कौटुंबिक कार्यक्रमासाठी प्रतिबंध अशा या बंदिस्त वातावरणामुळे प्रामुख्याने गृहिणी, नोकरदार व व्यावसायिक महिला आणि बच्चे कंपनीला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.

जाणून घ्या - पोलिसांनी चक्क शेतकर्‍यांच वेश धारण करून केला जंगलात प्रवेश; पुढे आले हे वास्तव

शाळा बंद व बाहेर खेळायलाही बंदी. यामुळे बच्चे कंपनीही चांगलीच हिरमुसली होती. एकंदरीत सर्वांच्या आनंदावर विरजण पडले होते. अशावेळी ‘अनलॉक’ची स्थिती निर्माण होताच घराबाहेर पडण्याची व प्रवासाची संधी उपलब्ध होताच ताणतनाव दूर करण्यासाठी बहुतांश शहरवासी गावाकडे धाव घेत आहेत.

बच्चेकंपनीचाही बंदीस्त वातावरणामुळे हिरमोड झाल्याने मामाच्या गावाला जाण्यासाठी उत्सुक असल्याचा हट्ट बघून निदान बच्चेकंपनीला तरी घराबाहेर पडून वातावरणाचा आनंद घेता यावा यासाठी प्रवासाची संधी उपलब्ध होण्याची वाट बघत असलेल्या शहरी महिलांना संधी उपलब्ध होताच अनेकांना गावाकडची ओढ लागली आहे.

हेही वाचा - हृदयद्रावक! बेपत्ता सव्वा महिन्याच्या बाळाचा मृतदेहच घरच्या विहिरीत तरंगताना आढळला

त्यामुळे धास्तावलेल्या सर्वसामान्य आर्थिक बजेट व करूनच समभाव धोका टाळण्यासाठी गावाकडे जाऊन नातेसंबंधातील लोकांकडे काही दिवस वास्तव्य करून नातेवाईकांसोबत येथील परत या फुलत्या शेतीत दिवस घालून शेतातच चुलीवरचे जेवण, हुरडा पार्टी, संत्रा, मोसंबी, पेरु, गांजर फळांचा आनंद घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधीत येथील निसर्गाच्या सानिध्यात रमणीय होतायेत.

बच्चेकंपनी आनंदाने खेळू बागडू लागली आहे. ग्रामीण भागात महिला व कृषी क्षेत्रात कष्ट करतात. परंतु आजच्या नव्या पिढीला शेती गावाकडच्या पारंपारिक पद्धती हे सारे माहीत नसते. त्यामुळे आम्हाला गावाकडली लोककला व येथील परंपरेचे दर्शन घेऊन प्रत्यक्ष शेतीतील कामाचा अनुभव होत असल्याचे मत गाव व शेतीपासून दूर गेलेल्या महिला भगिनी गावाकडे आल्यानंतर व्यक्त करतात.

सविस्तर वाचा - शेतजमिनीला मोल येताच नात्यात कटुता, एक स्वाक्षरी लाखोंची 

गावाकडे आल्यानंतर येथील निसर्गरम्य वातावरणात आगळा वेगळा आनंद मिळतो, असे मत नागपूरच्या दिघोरीच्या भावना वाडबुधे, भगवान नगर येथील सपना वाडबुधे, चिटणिस नगरच्या स्नेहल नागरे यांनी व्यक्त केले. शेतात चुलीवर तयार केलेले भोजन, फळांनी भरलेली शेती, उंच टेकडीवर असलेली पुरातन मंदिरे, नदी- नाले, ओढे, तलाव, पशुपक्षी व येथील लोकांमध्ये असलेली आदर सन्मानाची भावना यामुळे दोन-तीन दिवस वास्तव्य असतानांही शहरी भागापेक्षा गावाकडे एक आगळावेगळा आनंद मिळत असल्याचे सांगतात.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: As soon as it was unlocked the townspeople rushed to the village