esakal | लॉकडाउनमध्येही भरला चोहट्टा बाजारात आठवडी बाजार
sakal

बोलून बातमी शोधा

chahatta.jpg

अकोट तालुक्यातील चोहट्टा बाजारात आठवडी बाजाराच्या दिवसी शुक्रवारी (ता.24) आला. कुठलेही सोशल डिस्टन्सिंग न ठेवता, मुख्य रस्त्यावरच बाजार भरल्याचे पाहवयास मिळाले. बाजाराचा दिवस असल्याने परिसरातील नागरिकांची एकच झुंबड रस्त्यावर दिसत होती. त्यांना आवरताना पोलिसांच्या नाकी नऊ येत होते हेही तेवढेच खरे.

लॉकडाउनमध्येही भरला चोहट्टा बाजारात आठवडी बाजार

sakal_logo
By
रवी वानखडे

तरोडा (जि. अकोला) : कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राज्यभरात 3 मे पर्यंत लॉकडाउन घोषित केले आहे. अनेक ठिकाणी त्याचे काटेकोरपणे पालन देखील करण्यात येत असल्याने कोरोनाचा संसर्ग रोखण्यास काही प्रमाणात यश मिळाले आहे. परंतु, अनेक ठिकाणी त्याच नियमांची पायमल्ली होत असल्याने पोलिस, ग्रामपंचायत, नगरपालिका, मनपा प्रशासनाच्या चिंतेत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. याचा प्रत्यय अकोट तालुक्यातील चोहट्टा बाजारात आठवडी बाजाराच्या दिवसी शुक्रवारी (ता.24) आला. कुठलेही सोशल डिस्टन्सिंग न ठेवता, मुख्य रस्त्यावरच बाजार भरल्याचे पाहवयास मिळाले. बाजाराचा दिवस असल्याने परिसरातील नागरिकांची एकच झुंबड रस्त्यावर दिसत होती. त्यांना आवरताना पोलिसांच्या नाकी नऊ येत होते हेही तेवढेच खरे.


क्लिक करा- धक्कादायक! अल्पवयीन मुलीला खांद्यावर नेले मक्याच्या पिकात अन्...

नियमांची झाली पुन्हा पायमल्ली
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकार व राज्य शासनाकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. त्यामुळे वेळोवेळी तशा उपाययोजना नियमावली नगरपालिका व ग्रामपंचायत माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहचविल्या जात आहेत. प्रत्येक गावात भाजीपाला विक्रेते रोज सकाळी सहा ते 12 वाजेपर्यंत गावात जाऊन भाजी विक्री करत आसले तरी, देखील अकोट अकोला रोडवरील चौहट्टा बाजार येथे कुठल्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंग न ठेवता मुख्य रोडवर बजार भरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस असून, यावर संबंधित विभागाची नजर पडली नाही. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आला. मात्र, जीवनावश्यक वस्तुंची दुकाने दवाखाने, मेडिकल अत्यावश्यक सेवा वगळता इतरही दुकाने सुरू ठेवली जात आहेत. त्यामुळे दुकानांवर नागरिकांची गर्दी होऊन सामाजिक अंतर राखल्या जात नसल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येते. कोरोनाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने गर्दीच्या ठिकाणांवरून होत. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घरारातच सुरक्षित राहण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तरी देखील चौहट्टा बाजार येथे नियमांचे उल्लंघन करून आठवडी बाजार भरवला. चौहट्टा ग्रामपंचायतने दंवडी देऊनही बाजार भरल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. भाजी विक्रेते व नागरिक नियमांचे उल्लंघन करताना दिसून आले. स्थानिक बाजारपेठेत ज्या दुकांनाना सूट दिली नाही ती दुकाने सुद्धा सकाळपासून उघडण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने ऑटोमोबाईल, फोटो स्टुडिओ, टेड्रिंग कंपनी आदींचा समावेश आहे. तसेच या साहित्याचे ने-आण करण्यासाठी मार्गावर ऑटो देखील धावत असल्याचे निदर्शनास आले.


दवंडीचाही काही फायदा नाही
संबंधित ग्रामपंचायतच्या वतीने आठवडी बाजार नसल्याची दवंडी दिली होती. तरी देखील भाजीविक्रेत्यांनी सकाळपासूनच नेहमीच्या जागेवर न बसता चक्क मुख्य रस्त्यावरच दुकाने थाटून ग्रामपंचायतच्या सूचना व लॉकडाउनच्या नियमाला केराची टोपली दाखविली. रस्त्यावरील गर्दी दूर करण्याचा प्रयत्न पोलिस कर्मचाऱ्यांनी केला. मात्र, त्यांनाही यश आले नाही. त्यामुळे लॉकडाउनमध्येही चोहट्टा येथील आठवडी बाजार भरल्याचे चित्र पाहवयास मिळाले.


हेही वाचा- बुलडाणा जिल्ह्यात सर्वत्र शाळामध्ये ऑनलाइन ‘अभ्यासमाला’!

नियम मोडणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी
गेल्या काही दिवसांपासून चौहट्टा येथे गर्दी होत नव्हती. पण शुक्रवारी सकाळी अचानक लोकांनी एकत्र येऊन सोशल डिस्टन्सिंचे उल्लंघन केले. आम्ही लोकांना वारवार सांगूनही नागरिक व भाजी विक्रेते एकत्र गर्दी करत होते. जे नागरिक नियमाच उल्लंघन करत असतील तर त्यांच्यावर संबंधितांनी योग्य कारवाई करावी.
-गणेश बुंदे, पोलिस पाटील, चौहट्टा बाजार

सरपंचानी बोलण्याचे टाळले
आठवडी बाजर भरून शासनाच्या संचारबंदीचे भाजीविक्रेते व परिसरातील शेकडो नागरिकांनी उल्लंघन केले. दवंडी देऊनही बाजार भरला असता, स्थानिक ग्रामपंचायतचे सरपंच यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता, त्यांनी याबाबत काही न बोलण्याचे ठरविले.

ठाणेदार नॉट रिचेबल
शुक्रवारी आठवडी बाजारात भाजी विक्रेते व नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंग व संचारबंदीचे उल्लंघन बघायला मिळाले. पोलिस प्रशासनाला देखील गर्दी कमी करण्यास अपयश आले. याबाबत स्थानिक पोलिस स्टेशनच्या ठाणेदारांना अनेक वेळा फोन लावण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते नॉट रिचेबल होते.