Lockdown : उचल करायला कुणी नाही म्हणून केळी पिकाची अशी अवस्था

सुनील धूरडे
Monday, 20 April 2020

लॉकडाउनमुळे तेल्हारा तालुक्यातील दानापूर गावतील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. बाजार समितीच्या बंदमुळे केळी उत्पादकांच्या केळीची उचल करायला कुणाही व्यापारी तयार नसल्याची वास्तविकता आहे. त्यामुळे एक क्विंटलला 270 ते 280 इतका मातीमोल भाव मिळत असल्याचे दानापूर परिसरातील चित्र आहे.

दानापूर (जि. अकोला) : लॉकडाउनमुळे तेल्हारा तालुक्यातील दानापूर गावतील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. बाजार समितीच्या बंदमुळे केळी उत्पादकांच्या केळीची उचल करायला कुणाही व्यापारी तयार नसल्याची वास्तविकता आहे. त्यामुळे एक क्विंटलला 270 ते 280 इतका मातीमोल भाव मिळत असल्याचे दानापूर परिसरातील चित्र आहे.

क्लिक करा- बुलडाण्यात आणखी पाच जण कोरोना मुक्त

माल सप्लायची होत आहे अडचणी 
तेल्हारा तालुक्यातील दानापूर हे गाव वाण नदीच्या तीरावर वसलेले आहे. त्यामुळे शेतीत पाणी मुबलक असल्याने या परिसरात बागायतदार शेतकरी मोठी मेहनत करून भाजीपाला वर्गीय व फळबाग लागवड करतात. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना संसर्गाची देशाला पार्श्‍वभूमी असल्याने सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले. त्यामुळे बाजारपेठ बंद असलेल्याने येथील भाजीपाला उत्पादक व फळबाग उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. सोबतच लॉकडाउन मुळे दळण-वळणांच्य साधनांची वानवा आहे. परिणामी माल सप्लाय करण्यास अडचणी आहेत.

हेही वाचा- सांगा आता पीक कर्ज फेडायचे कसे

शासनाने लक्ष देण्याची गरज
दुसरीकडे ग्राहकांचा कमी प्रतिसाद व कमीदर यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. लॉकडाउनच्या आधी केळीला 700 ते 890 रुपयांचा प्रति क्विंटलचा भाव मिळत होता. तर आता एप्रिल-मे महिन्यामध्ये केळीला जवळ-जवळ एक हजार ते एक हजार 200 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असते. मात्र, यावर्षी या पिकाला फक्त 270 रु. प्रति क्विंटलचा भाव मिळत आहे. गतवर्षीच्या एप्रिल व मे महिन्यातील भावाचा ताळेबंद केला असता आता दोन ते तीन लाख रुपये एकरी नुकसानाला या शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच वाढते तापमाणामुळे भाजीपाला व फळबागा संकटात सापडलेल्या आहेत. याकडे शासनाने लक्ष देण्याची नितांत गरज आहे.

लागलेला खर्चही न निघण्याची शंका
साडेतीन एकरावर केळीची लागवड केली. साडेतीन एकराला चार लाख रुपयांपर्यंत खर्च आला. एप्रिल-मे महिन्यात केळीला हजार ते बाराशे रु. क्विंटल भाव मिळत असे. परंतु, कोरोनामुळे केळीच्या भावात मोठी घट झाली आहे. त्यामुळे लागलेला खर्चही न निघण्याची शंका आहे.
-विक्रम हागे, केळी उत्पादक शेतकरी, दानापूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lockdown : bananas price decreases in akola