लॉकडाउनमुळे आर्थिक उलाढाल थांबली, प्रत्येक ठिकाणी घरपोच सेवा शक्य नसल्यानं दुकानदार त्रस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लॉकडाउन

लॉकडाउनमुळे आर्थिक उलाढाल थांबली, प्रत्येक ठिकाणी घरपोच सेवा शक्य नसल्यानं दुकानदार त्रस्त

देवळी(जि. वर्धा) : कोरोनाचा (coronavirus) वाढता प्रकोप पाहता शासनाने कडक निर्बंध लावून कोरोना संक्रमण कमी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. परंतु, या निर्बंधामुळे सर्वसामान्य जनता, लहान दुकानदार, फेरीवाले यांची आर्थिकघडी विस्कळित (lockdown effect on small retailers) झाली आहे. या घटकाकडे कुणी लक्ष दिले नाही. कोरोना बाधितांची (corona positive) संख्या कमी होत असल्याचे श्रेय लाटण्यात आणि कडक लॉकडाउनचा (strict lockdwon)दिंडोरा पिटण्यात जिल्हा प्रशासन स्वत: धन्यता मानत असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्‍त केल्या. (lockdown effect on small retailers in deoli in wardha)

हेही वाचा: ऐन उन्हाळ्यात एसी आणि कूलरचा व्यवसाय लॉक; कोट्यवधींची उलाढाल ठप्प

कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावाने जनजीवन विस्कळित झाले आहे. सर्व क्षेत्रातील आर्थिक चक्र थांबले आहे. देवाण-घेवाण बंद झाली आहे. जो-तो फक्‍त आपलाच विचार करीत आहे. मदतीचे हात बंद झाले आहे. दिवाळीनंतर थोड्या फार प्रमाणात परिस्थिती जागेवर आली होती. मात्र, पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजला आहे. जिल्ह्यात 31 मेपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहे. यात सर्वसामान्य, किरकोळ व्यापारी आणि मजूर वर्गाचे मोठे हाल होत आहे.

घरपोच सेवा शक्‍य नाही

सर्वसामान्य नागरिक, झोपडपट्टी धारकांकडे मोबाईल नाही. त्यांना घरपोच किराणा दुकानदार नेऊन देणार काय, यावर स्वस्त दुकानदार म्हणतात, हे शक्‍य नाही. प्रशासनाने डोके गहाण करून आदेश काढण्याची टीका केली.

बॅंका सुरू मात्र लिंक नाही

दहा दिवसांपासून बंद असलेल्या शहरातील बॅंक ऑफ बडोदा, बॅंक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बॅंक, बॅंक ऑफ कॅनेरा, स्टेट बॅंक सुरू झाल्या. व्यवहाराकरिता नागरिकांनी प्रत्येक बॅंकेसमोर गर्दी केली होती. लिंक फेलमुळे अनेकांना ताटकळत उभे राहून त्रास सहन करावा लागला. पीककर्जाकरिता मोठ्या प्रमाणात शेतकरी बॅंकेत येत आहे, परंतु सेवा केंद्र बंद असल्याने शेतकऱ्यांना सातबारा, आठ अ आदी कागदपत्रे गोळा करणे कठीण होत आहे. शेतकरी वर्ग बंदमुळे आर्थिक अडचणीत आला आहे.

हेही वाचा: महिलेला १० मिनिटांतच लशीचा दुसरा डोस, गोंदियातील घटना

वर्षभरापासून स्कूलबसची चाके थांबली

शहरातील सृजन गुरुकुल, मारीया स्कूलसह, वर्धा, सावंगी मेघे येथे शिक्षणाकरिता जाण्याकरिता गावातील व बाहेर गावातील मुले मोठ्या प्रमाणात स्कूल बसने ये-जा करीत होती, पण शाळा बंदच असल्याने स्कूलबसची चाके थांबली आहे. स्कूलबस मालक, चालक इतर कामांवर जात आहे. तर काहींच्या हातांना काम नाही. गाडी मालकाची गंभीर परिस्थिती आहे. कर्जाचे हप्ते भरण्याची सोय नाही. काहींना बस विक्री काढल्या आहेत.याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज असल्याची सर्वस्तरातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

व्यापारी म्हणतात प्रशासनाचे डोके फिरले

देवळीत व्यापाऱ्यांसोबत संपर्क साधला असता त्यांना धोरण व नियमांबाबत शासनाचे डोके फिरल्याचे कडक शब्दात निंदा केली आहे. शंभर रुपयांचा किराणा सर्वसामान्य नागरिकांच्या घरापर्यंत कसा पोहोचवणा, असा प्रश्‍न त्यांनी प्रशासनाला विचारला आहे.

फेरीवाले म्हणतात जगावे कसे -

एकीकडे कोरोनाची भीती, दुसरीकडे शासनाने व्यवसाय बंद केला. त्यामुळे जगावे, कसे असा प्रश्‍न फेरीवाल्यांना पडला आहे. शेतकरीसुद्धा आर्थिक चक्रात सापडले आहे. पिकवले, पण विकता येत नाही. भाजीपाला गुरांना टाकण्याची वेळ आली आहे. इतर व्यापारी म्हणतात, आमचा तर व्यवसायच बंद करून देवळीत भाजी-फळेविक्रेत्यांची संख्या जवळपास 150 आहे. गावात फिरुन भाजी विकणे हा काहींचा परंपरागत व्यवसाय, पण लॉकडाउनमुळे व्यवसाय ठप्प पडला. ते आर्थिक संकटात सापडले आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Wardha
loading image
go to top