esakal | दोन नंबरवाल्यांना लॉकउडान चांगलाच घावला
sakal

बोलून बातमी शोधा

kham ph 14.jpg

गेल्या 24 मार्चपासून दोन टप्प्याततील लॉकडाउन आजही सुरू असून, जीवनावश्यक वस्तू वगळता इतर बाबी विकण्यावर बंदी घातली गेली आहे. त्यामुळे नशा करणाऱ्यांची मोठी पंचाईत सुरू आहे. जवळपास महिनाभरापासून बार, शॉपी व देशी दारूची दुकाने बंद असल्याने इंग्लिशवाल्यांनी गावरनवर मोर्चा वळविला असल्याने हा व्यवसाय तेजीत आला असतानाच त्यावरही पोलिसांच्या कारवाईचा सपाटा सुरू झाल्याने अशा व्यावसायिकांचे सद्या धाबे दणाणले आहे.

दोन नंबरवाल्यांना लॉकउडान चांगलाच घावला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदुरा (जि. बुलडाणा) : जवळपास एक महिन्यापासून लॉकडाउन सुरू असल्याने व्यसन करणाऱ्यांची मोठी पंचाईत झाली आहे. बिअर बार, शॉपी, देशी दारुची दुकाने एवढेच काय गावरान दारू विक्रेत्यांवरही पोलिसांची करडी नजर असल्याने पिणाऱ्यांची पंचाईत झाली आहे. तर गुटका व तंबाखू तसेच इतर नशांना प्रतिबंद असताना सहज उपलब्ध होणाऱ्या या सर्वच गोष्टी विशिष्ट साखळी पद्धतीने आजही चढ्या भावाने विकल्या जात आहे. आजही 100 रुपयाची दारू 400 रुपयाला मिळत असून किराणा दुकानात 20 रुपयाची गुटका पुडी 40 रुपयाला व तंबाखूची पुडी डबल भावात विकल्या जात असल्याने या पदार्थाची तस्करी करणाऱ्यांना हा लॉकडाउन चांगलाच घावल्याचे दिसून येत आहे.

क्लिक करा- बुलडाण्यात आणखी पाच जण कोरोना मुक्त

दुप्पट-तिप्पट किमतीत विक्री
गेल्या 24 मार्चपासून दोन टप्प्याततील लॉकडाउन आजही सुरू असून, जीवनावश्यक वस्तू वगळता इतर बाबी विकण्यावर बंदी घातली गेली आहे. त्यामुळे नशा करणाऱ्यांची मोठी पंचाईत सुरू आहे. जवळपास महिनाभरापासून बार, शॉपी व देशी दारूची दुकाने बंद असल्याने इंग्लिशवाल्यांनी गावरनवर मोर्चा वळविला असल्याने हा व्यवसाय तेजीत आला असतानाच त्यावरही पोलिसांच्या कारवाईचा सपाटा सुरू झाल्याने अशा व्यावसायिकांचे सद्या धाबे दणाणले आहे. त्यामुळे त्यांनीही भाव वाढविले आहे. सोबतच किराणा दुकान जीवनावश्यक वस्तूत येत असल्याने व पान टपऱ्या बंद असल्याने गुटका व तंबाखू पुड्या ह्या किराणा दुकानात दुप्पट किमतीत विकल्या जात आहेत. सर्व बंद असताना सर्व मिळण्याची ही परंपरा नवीन नसल्याने हवे ते मिळणे तसे काही वावगे नसल्याने इंग्लिश दारूचा 100 रुपयांपर्यंतचा पॅक 400 रुपयाला उपलब्ध केल्या जात असून, 20 रुपयाची गुटका पुडी 40 रुपयात व तंबाखू पुडी डबल किमतीत चोरी छुपके मिळत आहे. त्यामुळे दामदुप्पट-तिप्पटचे आयते कोलीत या दोन नंबरवाल्याना लॉकडाउनमुळे मिळाले असल्याने त्यांना लॉकडाउन चांगलाच घावला आहे.

हेही वाचा- सांगा आता पीक कर्ज फेडायचे कसे?

पोलिसांवर वेगळाच ताण
सध्या जगावर कोरोनाचे संकटा आहे. परंतु, यागोष्टी अवैध धंद्या वाल्‍यांना काहीच सोयरसुतक नसून ते पैसे कमविण्यासाठी कोणत्‍याही स्‍तराला जाण्यास तयार आहेत. जिल्‍ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारुसाठा, गुटखा, तंबाखूजण्य पदार्थ जप्‍त केल्‍या जात असून, कोरोनाच्‍या लढ्यात आपली भूमिका बजावत असलेल्‍या पोलीसांना या वेगळ्या परिस्‍थितीचाही सामना करावा लागत आहे.


तंबाखू पुडीचे पॅकिंग बदलले
नशिली पदार्थांच्या विक्री व उत्पादनावर सद्या बंधने असल्याने खुली तंबाखू विना नावाने साध्या पन्नीत विक्रीला आली असून, दुप्पट-तिप्पट किमतीत ती ग्राहकाला सहज किराणा दुकानात उपलब्ध झाली आहे. त्यामुळे या दुकानदारांना दोन पैसे कमविण्याची नामी संधी उपलब्ध झाली आहे.

गुटका विक्रेते आम्हच्या रडावर
सध्या सर्वच परवाना धारक बार, देशी विदेशी दारुचे दुकान उघडण्यास मनाई आहेत. परंतु, काही जणांकडून अवैधरित्‍या दारू विक्री होत आहे. अशांच्‍या आम्‍ही मार्गावर असून, आतापर्यंत अनेकांवर कारवाई देखील करण्यात आली आहे. तसेच अवैधरित्‍या गुटखा विक्री करणारे देखील आमच्‍या रडारवर आहेत.
-अनिल पाटील, पोलिस निरीक्षक, नांदुरा