लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ!

रक्षित बोदडे
Tuesday, 28 April 2020

कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने लॉकडाउन जाहीर केले. त्यामुळे उद्योगधंदे बंद असल्याने अनेकांच्या हाताला काम राहिले नाही. खरीप हंगाम सुरू होणार या आशेने शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागती पैसा गोळा करून ठेवला होता. मात्र, लॉकडाउनच्या काळात तो उदरनिर्वाहावर खर्च होत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होत आहे. शासनाने शेतकऱ्यांना मोफत बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी परिसरातून होत आहे.

भांबेरी (जि. अकोला) : कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने लॉकडाउन जाहीर केले. त्यामुळे उद्योगधंदे बंद असल्याने अनेकांच्या हाताला काम राहिले नाही. खरीप हंगाम सुरू होणार या आशेने शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागती पैसा गोळा करून ठेवला होता. मात्र, लॉकडाउनच्या काळात तो उदरनिर्वाहावर खर्च होत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होत आहे. शासनाने शेतकऱ्यांना मोफत बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी परिसरातून होत आहे.

क्लिक करा- क्लिक करा- अकोल्यातील युवकाने केली ‘कोविड’वर मात!

अनेक पिकांची झाली होती नासाडी
गत पाच ते सहा वर्षापासून परिसरातील शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. सततच्या नापिकीमुळे शेतकरी वर्ग पूर्णंता हतबल झालेला आहे. मागील वर्षी झालेल्या नापिकीची दरी यावर्षी निसर्गराजा भरून काढेल या आशेने शेतकरी उसनवारीवर पैसे घेऊन शेतीला लावतो. मात्र, गेल्या पाच ते सहा वर्षांपासून निसर्गराजा कोपलेला आहे. शेतीवर केलेला खर्च सुद्धा निघू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कर्जाचा डोंगर वाढताच आहे तर, मागील वर्षी परिसरात पावसाने जोरदार हजेरी लाऊन सुद्धा शेतकऱ्यांना काहीच फायदा झाला नाही. कोरड्या दुष्काळाचे रूपांतर ओल्या दुष्काळात झाले. मूग, सोयाबीन, उडीद, ज्वारी या पिकांची सततधार पावसाने पूर्णंता नासाडी केली. याशिवाय कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीने अचानक आक्रमक करून पांढरे सोनं काळ केलं व शेतकऱ्यांना मातीमोल भावाने विकावे लागले व शेतकऱ्यांच्या नशीबी पुन्हा निराशाच आली. यावर्षी शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचे नियोजन करून ठेवले होते. मात्र तेही आता कोरोनामुळे कोलमडल्याचे पहायला मिळत आहे. शेतीच्या मशागतीसाठी उभा करून ठेवलेला पैसे उदरनिर्वासाठी खर्च झाल्याने शेतकऱ्यांवर चिंतेंंचे ढग दाटल्याचे दिसून येत आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा- तेलाच्या गोदामाला आग; लाखोंचे नुकसान

शेतकरी चिंतेत पडला आहे
महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून नागरिक लॉकडाउनमुळे घरीच आहेत. सर्व उद्योग धंदे बंद असल्याने आर्थिक अडचण भासत आहे. शेतीची मशागत व पेरणीचा कालावधी जवळ येत आहे. जवळील पैसे खर्च झाल्याने शेतकरी वर्ग चिंतातूर झाला आहे.
-पंजाब तायडे, शेतकरी, मनब्दा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown raises farmers' worries