

Buldhana News
esakal
लोणार : लोणार तालुक्यात पेट्रोल-डिझेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल पंपांवर लागलेल्या लांबच लांब रांगा, शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत असताना काही “सेटिंग”धारकांना मात्र मागच्या दाराने इंधन पुरवठा होत असल्याचे वास्तव दैनिक “सकाळ” ने दि. १९ मे च्या अंकात ठळकपणे प्रकाशित केले होते. या वृत्ताची गंभीर दखल घेत लोणार तहसील प्रशासनाने आता कडक पावले उचलली आहेत.