Lonar Lake
esakal
महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः बुलडाणा जिल्ह्यासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. जगभरात प्रसिद्ध असलेल्या लोणार सरोवराला आता जागतिक स्तरावर आणखी एक मोठा सन्मान मिळाला आहे. ‘तिसऱ्या १०० जागतिक भूगर्भीय वारसा स्थळांच्या’ यादीत लोणार सरोवराचा समावेश करण्यात आला आहे.
भारत सरकारच्या खाण मंत्रालयाने याबाबत अधिकृत माहिती जाहीर केली आहे. हा बहुमान मिळवणारे लोणार सरोवर हे भारतातील दुसरेच ठिकाण ठरले आहे. याआधी मेघालयातील मावमलुह लेणीला हा सन्मान मिळाला होता. या जागतिक मान्यतेमुळे लोणारच्या पर्यटनाला आणि भूगर्भीय संशोधनाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.