Kalmeshwar Crime : परीक्षेला आलेल्या तरुणीला पळविले

कळमेश्वर तालुक्यातील लोणारा गावातील रहिवासी असलेली एक २१ वर्षीय तरुणी कळमेश्वरातील इंदिरा गांधी महाविद्यालयात परीक्षा केंद्रावर पेपर देण्यास घरून निघाली.
Crime
Crimesakal
Updated on

कळमेश्वर - तालुक्यातील लोणारा गावातील रहिवासी असलेली एक २१ वर्षीय तरुणी कळमेश्वरातील इंदिरा गांधी महाविद्यालयात परीक्षा केंद्रावर पेपर देण्यास घरून निघाली.

मात्र पेपर देण्यास पोहोचल्याने संधी साधून गावातीलच अज्ञात तरुणांनी तिला गाठून फूस लावून पळवून नेल्याची तक्रार पीडित मुलीने कळमेश्वर पोलिसांत दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कळमेश्वर येथे असलेल्या केझेएस महाविद्यालयात बीएससी अंतिम वर्षाला पीडित तरुणी असून ती तालुक्यातील लोणारा येथील रहिवासी आहे.

ही तरूणी ३१ मे रोजी दुपारी एकच्या सुमारास कळमेश्वरातील इंदिरा गांधी महाविद्यालय येथे परीक्षेकरिता आली. तेथील समोरील टी पॉईंटवर आरोपींनी जबरदस्तीने तरुणीला कारमध्ये डांबून लिंगा लाडाई येथील जंगलात नेले. ‘तू माझ्याशी लग्न कर’ म्हणत दोन दिवस तिथे ठेवले. परंतु तरुणीने नकार देत २ जून रोजी आरोपीच्या तावडीतून कसीबशी सुटका केली व घर गाठले. पालकांना आपल्यावर झालेली आपबीती सांगितली.

तरुणी व तिच्या पालकांनी तत्काळ कळमेश्वर पोलिस ठाणे गाठून आपली तक्रार दाखल केली. आरोपी गणेश ध्यानेश्वर डेहनकर (वय २६, रा. लोणारा), रवी दिगंबर डेहनकर(वय २६), संकेत नंदू डेहनकर(वय २२, रा. लोणारा) यांना कळमेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपींनी तरुणीच्या अपहरणासाठी वापरलेली कारजप्त केली असून आरोपींची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहॆ . आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sanjay Gandhi death anniversary
Maharashtra: १९ वर्षीय तरुणी ५५ वर्षीय शिक्षकाच्या प्रेमात, गावकऱ्यांची शिक्षकाला मारहाण; पोलिसांसमोर म्हणाली, मी...
Yavatmal fake marriage case
Birth-Death Section Gutted in Early Morning Fire at Kalmeshwar Municipal Council
Marathi News Esakal
www.esakal.com