esakal | संचारबंदीत फुलला लुटीचा बाजार!

बोलून बातमी शोधा

Loot into a curfew at Akola

गव्हाचे दरात किलोमागे १० ते १२ रुपायंनी वाढ
 सर्वच डाळीचे दर २५ ते ५० रुपयांनी वाढवले
 तेलाचे दर २५ ते ५० रुपयांनी वाढवले
 सारखेच दर १० ते १२ रुपयांनी वाढले
 भाजीपाला किलोमागे २० ते ४० रुपयांवर वाढ
बटाचे, टोमॅटो, कांद्याच्या दरात २० रुपयांपर्यंत वाढ
संत्रा व पपई वगळता इतर फळांची मागणी घटली, परिणामी दर स्थिर

संचारबंदीत फुलला लुटीचा बाजार!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला :  कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून १४ एप्रिलपर्यंत देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे धास्तावलेल्या नागरिकांनी २४ तारखेपासून जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात व किरणा दुकानांवर एकच गर्दी केली आहे. नेमका याचाच फायदा उचलून व्यापाऱ्यांनी धान्य, तेल, साखर, डाळीच्या दरात मोठी वाढ केली आहे. मालवाहतूक बंद असल्याचे कारण सांगून आणि असलेला साठा संपत आल्याचे कारण देवून ग्राहकांनी मोठ्याप्रमाणावर लुट सुरू आहे. विशेष म्हणजे, विचारणा करणाऱ्यांना माल नसल्याचे सांगून परत पाठविले जात असल्याने नागरिकही मिळेल त्याभावात खरेदी करण्यासाठी गर्दी करताना दिसत आहे.


सामूहिक संपर्कातून कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्याप्रमाणावर होतो. याचे परिणाम जगभरातील १९५ देश भोगतायेत. त्यामुळे वेळीच साधव होऊन भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन करण्यात आला. असे असले तरी नागरिकांना जीवनावाश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित होत राहील, यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहे. औषध, किराणा माल, भाजीपाल्याच्या वाहतुकीला सुट देण्यात आली आहे. त्यानंतर नागरिकांनी बाजारात गर्दी करण्यास सुरुवात केल्याने राज्य शासनाने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास सुरू ठेवण्यास मान्यता दिला आहे. जेणे करून एकाच वेळी नागरिक गर्दी करणार नाही. याचाही बाजारात फारसा परिणाम दिसून आलेला नाही. कोणतीही सुरक्षा न पाळता नागरिका बाजारात गर्दी करीत असून, व्यापारीही या गर्दीचा फायदा घेवून चढ्या दराने मालांची विक्री करीत आहेत.


असे वाढविले दर
 गव्हाचे दरात किलोमागे १० ते १२ रुपायंनी वाढ
 सर्वच डाळीचे दर २५ ते ५० रुपयांनी वाढवले
 तेलाचे दर २५ ते ५० रुपयांनी वाढवले
 सारखेच दर १० ते १२ रुपयांनी वाढले
 भाजीपाला किलोमागे २० ते ४० रुपयांवर वाढ
बटाचे, टोमॅटो, कांद्याच्या दरात २० रुपयांपर्यंत वाढ
संत्रा व पपई वगळता इतर फळांची मागणी घटली, परिणामी दर स्थिर

प्रशासनाकडून नियंत्रण ठेवण्याची गरज
जीवनावश्यक वस्तू नियमित मिळत राहाव्यात म्हणून जिल्हा प्रशासन व महानगरपालिका प्रशासनाला जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र प्रशासनावर इतर कामांचाच ताण अधिक वाढल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढवून माल विक्री होत असतानाही त्यावर प्रशासनाला नियंत्रण ठेवणे अशक्य झाले आहे. आता प्रशासनाने नागरिकांची होणारी लुट थाबंविण्यासाठी कठोर उपाययोजना करून दरांवर नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

अनावश्यक साठा करण्यावर भर
नागरिकांनामध्ये लॉकडाउन आणखी लाबंण्याची धास्ती आहे. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त माल एकाच वेळी नागरिक खरेदी आहेत. शासनाकडून वारंवार जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा नियमित होणार असल्याचे सांगितले जात आहे. राशन दुकानांमधून पुढील तीन महिन्यांचे धान्य दिले जाईल. एप्रिलमध्ये याचे वितरण होणार आहे. असे असतानाही नागरिकांकडून अनावश्यक साठा केला जात आहे. त्यामुळेही बाजारात दर वाढवून व्यापारी जीवनावश्यक वस्तूंची विक्री करीत आहेत.

प्रशासनाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष
व्यापाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार न करण्याची तंबी प्रशासानकडून देण्यात आली आहे. चढ्या दराने विक्री किंवा साठेबाजी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्याकडे व्यापाऱ्यांनी दुर्लक्ष करून चढ्या दराने जीवनावश्यक वस्तूंची विक्री सुरू केली आहे. त्यामुळे असे प्रकार आढळल्यास नागरिकांनी ते प्रशासनाच्या लक्षात आणून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.