esakal | गोपाळकृष्णाचा मुक्काम वाढला, या शहरात होणार एक दिवस विलंबाने विसर्जन, काय असावे कारण...
sakal

बोलून बातमी शोधा

Lord Krishna's stay will increase by one day

अनेक वर्षांची परंपरा राखत हा उत्सव साजरा करण्यासाठी काल कान्होबाची स्थापना करण्यात आली तिथीनुसार सर्व पूजाअर्चना केली. आज  दुसऱ्या दिवशी गोपालकाला करून कुठे दहीहंडी फोडून कान्होबाचे मिरवणुकीतून विसर्जन करून निरोप दिला जात असतो. 

गोपाळकृष्णाचा मुक्काम वाढला, या शहरात होणार एक दिवस विलंबाने विसर्जन, काय असावे कारण...

sakal_logo
By
भगवान पवनकर

मोहाडी (जि. भंडारा)  : शीर्षक वाचून अवाक झाले ना हो हे खरे आहे. दरवर्षी दीड दिवसाच्या मुक्कामाला थांबणारे कान्होबा यावर्षी अडीच दिवसाच्या मुक्कामाने विराजमान झाले आहेत. त्यामुळे सालाबादप्रमाणे यावर्षी एकदिवस जास्त थांबणार आहेत. स्थानिक मोहाडी शहरात  व तालुक्यात सत्तर टक्के कुटुंबाकडे कान्होबा मुक्कामाने राहणार आहेत.
 
काल 11 आॅगस्टला तिथीप्रमाणे मोठ्या आनंदात श्री कृष्णाची स्थापना करण्यात आली. दीड दिवसाच्या मुक्कामी राहणाऱ्या कृष्ण देवाची मनोभावे पूजा अर्चना केली जाते स्थानिक मोहाडी शहरात कान्होबाचा उत्सव मोठ्या आनंदोत्सवात साजरा केला जातो. अनेक वर्षांची परंपरा राखत हा उत्सव साजरा करण्यासाठी काल कान्होबाची स्थापना करण्यात आली तिथीनुसार सर्व पूजाअर्चना केली. आज  दुसऱ्या दिवशी गोपालकाला करून कुठे दहीहंडी फोडून कान्होबाचे मिरवणुकीतून विसर्जन करून निरोप दिला जात असतो. 

उघडून तर बघा - ऑनलाईन काजू, विलायची मागवताय, जरा थांबा... अमरावतीत घडली ही घटना
 

कुणी कान्होबा विसर्जन करण्यापूर्वीच जेवण करून कान्होबाला निरोप देतात. मात्र यावर्षी दीड दिवसाच्या कान्होबाचा मुक्काम  एक दिवसाने वाढला आहे. त्याचे कारणही तसेच आहे पौराणिक तिथीनुसार श्री कृष्णाचा जन्म बुधवारच्या मध्यरात्री झाल्याची जुने जाणकार पुराणानुसार सांगत असून, जन्माच्या दिवशीच कसे विसर्जन करायचे या श्रद्धेनुसार एक दिवस जास्त मुक्काम करणार आहेत.  मात्र. काही नागरिक तिथीनुसार स्थापना झाल्याने आजच विसर्जन करणार आहेत तर सत्तर टक्के नागरिक श्रद्धेनुसार उदयाला ता. 13 विसर्जन करणार आहेत.
 
यावर्षी कोरोना महामारीने या उत्सवाच्या आनंदावर विरजण पडले. जिल्ह्यात मोहाडीचा कान्होबा उत्सव सर्व दूर प्रसिद्ध आहे. वर्षभर गावाकडे न फिरकणारे कान्होबानिमित्त हजेरी लावतात. मात्र, यावर्षी गावाचे दर्शन घेणाऱ्यांची संख्या घटली असली तरी कोरोना आजाराने आणलेल्या प्रतिबंधाने व शासन निर्देशानुसार सामूहिकरीत्या विसर्जन व मिरवणूक काढण्यास प्रतिबंध असल्याने हिरमोड होणार आहे. 

उद्या होणार विसर्जन 


बुधवार दिवस श्री कृष्णाचा जन्म दिवस असल्याने श्रीकृण भक्त उद्याला सकाळी व सायंकाळी कान्होबाचे विसर्जन करणार आहेत. उद्याला विसर्जन करणाऱ्याची संख्या शहरांसह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात राहणार आहे. दीड दिवसाचा कानोबा देव दहा वर्षा पूर्वी अडीच दिवसाच्या मुक्कामाने आले होते असे जुने जानकर ओमकार वैरागडे यांनी सांगितले आहे