कुछ दिन का खेल था मोहब्बत का...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

नागपूर - त्याच्या आणि तिच्यातील प्रेमाचा प्रवास विवाहापर्यंत येऊन पोहोचतो. विरोधाचे वार झेलून दोघेही आपला मार्ग निवडतात आणि संसार थाटतात. या वाटेवर एक मसिहा  मदतीसाठी उभा असतोच, तसा तो त्यांच्याही वाट्याला आला. त्याने आधार दिला, पण दोनच महिन्यांमध्ये जोडपे विभक्त झाले. अगदी शांतपणे घेतलेला निर्णय शेकडो प्रश्‍न उभे करून गेला. 

२३-२४ वर्षांचा मुलगा आणि २०-२१ वर्षांची मुलगी. दोघेही भिन्न धर्माचे. मंदिरात लग्न करून एका छोट्याशा खोलीत संसार थाटला. दोन महिने या खोलीत काढल्यानंतर एका फ्लॅट  स्किममध्ये चौकीदारासाठी असलेल्या खोलीत शिफ्ट झाले. त्याच ठिकाणी काम करण्याच्या अटीवर खोली मिळाली.

नव्या ठिकाणी संसार सुरू झाला. एक दिवस अचानक या मुलाने फ्लॅट स्किमच्या ऑफिसमध्ये जाऊन रूम सोडणार असल्याचे सांगितले. कारण सांगताना तो म्हणाला, ‘तिला घेऊन जायला तिची आई आली होती आणि ती तयार झाली. मी पण वडिलांना बोलावले आहे. उद्या तिची आई व माझे वडील येतील. आमची बैठक होईल आणि आम्ही खोली सोडून देऊ.’ किरण यांच्या मनात अनेक प्रश्‍न निर्माण झाले. मुलाने सांगितलेले कारण विभक्त  होण्यासाठी पुरेसे होते? आंतरधर्मीय विवाहाचा असा शेवट शोकांतिका होतीच, पण इतक्‍या सहज आणि शांततेत ताटातूट व्हावी, ही अधिक अस्वस्थ करणारी बाब होती. दुसऱ्या दिवशी इलेक्‍ट्रिक मीटरच्या वर चावी ठेवली होती... मनात बंदिस्त असलेल्या प्रश्‍नांचे कुलूप उघडण्यात असमर्थ ठरलेली चावी !

संवेदनशील मनं होतात अस्वस्थ
काही घटना आपल्या आसपास घडत असतात. पण काही घटना संवेदनशील मनांना अस्वस्थ करून जातात. त्यातही ही व्यक्ती कवीमनाची असेल तर या कोलाहलाला कुठलीच मर्यादा नसते. किरण मेश्राम या कवीने आपल्या वाट्याला आलेला अनुभव अब्रार काशिफच्या शब्दांत  मांडला. ‘कुछ दिन का खेल था ये मोहब्बत का खेल भी... ये अपने गांव आ गया वो अपने घर गई’... या अब्रारच्या ओळींचा आधार घेण्याची गरज पडावी, असेच हे कथानक आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: love marriage life intercaste love

टॅग्स