esakal | प्यार दिवाना होता है! टिकटॅकवर झाली ओळख, घेतल्या आणाभाका आणि...
sakal

बोलून बातमी शोधा

marrige

प्रेमाचे रंग न्यारेच असतात. कधी केव्हा आणि कुणाशी प्रेम होईल, हे सांगताच येत नाही. प्रेमाला ना सीमांच, ना जातीपातीच बंधन. आर्वी येथील युवकाने टिकटॅकवर टाकलेला व्हिडिओ मध्यप्रदेशातील युवतीला आवडला आणि ती बया चक्क त्या मुलाच्या प्रेमात पडली

प्यार दिवाना होता है! टिकटॅकवर झाली ओळख, घेतल्या आणाभाका आणि...

sakal_logo
By
दशरथ जधव

आर्वी (जि. वर्धा) : अलिकडे सोशल मीडिया हे प्रेम बहरण्याचे महत्त्वाचे माध्यम ठरत आहे. कधी फेसबुकवर कधी व्हॉट्सॲपवर परीचय होतो आणि प्रेम जुळते. आणि लग्न होते. कधी कधी मात्र यामध्ये मोठी फसवणुक होते आणि जन्मभर पश्चात्तापाची पाळी येते. त्यामुळे माध्यमांवर प्रेम जुळते, तेव्हा सावधगिरी खूप गरजेची आहे.

प्रेमाचे रंग न्यारेच असतात. कधी केव्हा आणि कुणाशी प्रेम होईल, हे सांगताच येत नाही. प्रेमाला ना सीमांच, ना जातीपातीच बंधन. आर्वी येथील युवकाने टिकटॅकवर टाकलेला व्हिडिओ मध्यप्रदेशातील युवतीला आवडला आणि ती बया चक्क त्या मुलाच्या प्रेमात पडली. ते दोघेही लग्न बंधनात अडकले.

माळगण वॉर्डात राहणाऱ्या मिलिंद अजाबराव मेहरे याला नृत्य आणि अभिनयाचे चलचित्र टिकटॅकवर टाकण्याचा छंद होता. त्याने टाकलेला अभिनयाचा व्हिडिओ मध्यप्रदेश राज्यातील छिंदवाडा जिल्ह्यातील जुन्नरदेव तालुक्‍यातील डोंगरगाव या गावातील लताशा चव्हाण या युवतीपर्यंत पोहोचला. तिला तो आवडल्यामुळे तिने लाईक करून मिलिंदचा टिकटॅक अकाउंट फॉलो केला. त्याला मिलिंदने प्रतिसाद दिला.

महिनाभर दोघांमध्ये टिकटॉकवरच हाय हॅलो चालले, दोघांचे विचार जुळले आणि हळूहळू प्रेम बहरू लागले. दरम्यान, लताशाचा मोबाईल नंबर बदलला तिने नवीन नंबर पाठवून कॉल बॅक करण्याची विनंती केली. हळूहळू टिकटॅकवरील भेट एक दुसऱ्यासोबत संवाद साधण्यापर्यंत पोहोचली.

मिलिंदच्या मनातील भावना लताशाला व लताशाच्या मनातील भावना मिलिंदला न बोलता कळत होती. ऑनलाइन भेट झाली नाही तर दोघांनाही चुकल्याचुकल्या सारखे वाटत असे. १० ऑगस्ट २०१९ पासून फुलत चाललेल्या प्रेमाची अखेर कोंडी फुटली. एक महिन्यापूर्वी लताशाने मिलिंदला लग्न साठी विचारले. मिलिंदनेही होकार दिला. होकार मिळताच आईवडिलांना न सांगता लताशा राज्याच्या सीमा पार करून आर्वीला एकटीच पोहोचली.

सविस्तर वाचा - मोठी बातमी : ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना कोरोनाची लागण; पत्नीही पॉझिटिव्ह

येथील बसस्थानकावर बुधवारी (ता.नऊ) झालेली दोघांची भेट पहिलीच होती. एक दुसऱ्याला पाहताच दोघांचाही आनंद गगनात मावेनासा झाला. गुरुवारी (ता.दहा) दोघांनी यवतमाळ गाठले आणि श्री. सत्यनारायण भूत चॅरिटेबल ट्रस्टमध्ये साक्षीदारांच्या उपस्थितीत लग्न बंधनात अडकले. याची माहिती त्यांनी येथील पोलिस ठाण्यात दिली असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

संपादन - स्वाती हुद्दार