esakal | मोठी बातमी : ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना कोरोनाची लागण; पत्नीही पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

Energy Minister Nitin Raut infected with corona

त्याआधी सप्टेंबर महिन्यातच दुग्धविकास मंत्री सुनील केदार, राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपुरे यांनाही कोरोना संसर्ग झाला होता. आता नितीन राऊत यांना कोरोनाची लागण झाली आहे.

मोठी बातमी : ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना कोरोनाची लागण; पत्नीही पॉझिटिव्ह

sakal_logo
By
नीलेश डाखोरे

नागपूर : ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेसचे नेते व ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना कोरोनाचा लागण झाली आहे. नितीन राऊत यांनी स्वतः ट्विट करून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन नितीन राऊत यांनी ट्विटरवरून केले आहे.

गेल्या आठवड्यातच काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, कोणतीही लक्षणं नसल्याने पुण्यातील घरातच ते होम क्वारंटाईन झाले आहेत. विश्वजीत कदम यांच्याकडे ठाकरे सरकारमध्ये सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ आणि मराठी भाषा विभागाचे राज्यमंत्रीपद आहे.

हेही वाचा - चक्‍क देवीसमोर गुडघे टेकले होते कट्टर इस्लाम मानणारा बादशहा औरंगजेबाने! वाचा कुठे आहे मंदिर

त्याआधी सप्टेंबर महिन्यातच दुग्धविकास मंत्री सुनील केदार, राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपुरे यांनाही कोरोना संसर्ग झाला होता. आता नितीन राऊत यांना कोरोनाची लागण झाली आहे.

पत्नीही पॉझिटिव्ह

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या पत्नीही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. मिसेस राऊत यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. त्याचप्रमाणे कामठी मतदार संघाचे आमदार टेकचंद सावरकरही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

नितीन गडकरीही पॉझिटिव्ह

दोन दिवसांपूर्वी म्हणजे बुधवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनही आपल्या संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिल होता. कोरोनाचा विळखा वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी - ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये तब्बल ५ कोटी जिंकलो आणि आयुष्य झाले खडतर" स्वतःच सांगतोय करोडपती सुशील कुमार..वाचा सविस्तर

सुरक्षित राहा आणि काळजी घ्या
माझी कोव्हिड चाचणी आज पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती करू इच्छितो की, सावधगिरीचा उपाय म्हणून त्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी. सुरक्षित राहा आणि काळजी घ्या. असे आवाहन नितीन राऊत यांनी ट्विटरवरून केले आहे.
- नितीन राऊत,
काँग्रेसचे नेते व ऊर्जामंत्री