आधी खाल्ला मार, आता थाटला संसार

deulgoan
deulgoan
Updated on

देऊळगावराजा : जालना तालुक्यातील गोंदेगाव शिवारात गेल्या आठवड्यात परिसरातील काही जनावरे चारणाऱ्या पाच गुराख्यांच्या एका टोळक्याने तलावावर फिरण्यासाठी आलेल्या महाविद्यालयीन प्रेमीयुगुलाला मारहाण करत तरुणीचा विनयभंग केला होता. यासंदर्भातील एक व्हीडीओ सोशल मीडियावर देखील 31 जानेवारीला व्हायरल झाला होता. सदर घटनेतील प्रेमीयुगुल हे देऊळगावराजा तालुक्यातील होते. दरम्यान, या घटनेतील आरोपींना पोलिसांनी पकडले आहे. तर, या प्रेमीयुगुलाने 4 जानेवारीला अत्यंत साध्या पद्धतीने देवीच्या मंदिरात विवाह केल्याचे समोर आले आहे. शुभमंगल उरकल्याने ते दोघे रेशीमगाठीत अडकले.

गोंदेगाव शिवारातील तलाव परिसरात 29 जानेवारीला बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुक्यातील होते. यावेळी त्याच शिवारात जनावरे चारणार्‍यासाठी आलेल्या पाच तरुणांच्या टोळक्याने त्या प्रेमीयुगुलाला मारहाण करत त्यांचा व्हीडीओ काढला होता. तो व्हीडीओ शुक्रवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आला. व्हीडीओमध्ये पीडित तरुणीच्या शर्टची कॉलर धरून तिला ओढत असल्याचे दिसून येत होते. तर, पीडित तरुण हा या टोळक्यासमोर त्या तरुणीला सोडा म्हणत हातापाया पडत असल्याचे दिसत आहे. ही घटना घडल्यानंतर प्रेमीयुगुल तक्रार देण्यास पुढे आले नाही. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सदर प्रकरणात लक्ष घालून आरोपींचा शोध घेऊन तत्काळ अटक करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर पोलिस अधीक्षक चैतन्य एस. यांच्या हाती पडल्यानंतर त्यांनी तत्काळ आरोपी टोळक्याला शोधासाठी पोलिसांचे पथक गोंदेगाव शिवारात पाठविले होते. 

पाच टवाळखोरांना अटक

या पथकाचे पाच टवाळखोरांना अटक केली. दरम्यान, याबाबत जालना पोलिसांनी दखल घेत प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत यातील तरुणांना अटक केल्यानंतर जालना पोलिसांचे एक पथक बुलडाण्यातही दाखल झाले होते. दरम्यान, आज (ता.4) जालना न्यायालयाने त्या आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली तर सदर प्रेमीयुगुल यांच्या कुटुंबाने सामंजस्याने एकत्र बसून त्यांचा विवाह मेंडगाव येथे देवीच्या मंदिरात झाले असल्याचे कळते आहे. एकाच समाजातील असल्याने आणि मुलगा आणि मुलगी लग्नासाठी तयार असल्याने हे लग्न अगदी साध्या पद्धतीने आणि मोजक्याच नातेवाइकांच्या साक्षीने करण्यात आले. त्यामुळे आता या दोघांच्या प्रेमप्रकरणाला पूर्णविराम मिळाला आहे. 

वाईट प्रसंगाला विसरून जीवनाची नवीन सुरवात

एक आठवड्यापूर्वी समाजकंटक टवाळखोरांकडून अमानुष मारहाणीच्या वाईट प्रसंगाला विसरून त्या प्रेमीयुगुलाने जीवनाची नवीन सुरवात केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com