Yavatmal News: माधान-ब्राह्मणवाडा मार्गावर धूळच धूळ ; सिमेंट रस्त्यावर पाण्याचा अभाव, अपघात व आजारांना निमंत्रण

Health Risks from Dust Pollution: शिरजगावबंड परिसरातील माधान-ब्राह्मणवाडा रस्त्यावर धूळ उडण्यामुळे दुचाकी अपघातांचा धोका आणि श्वसनाचे आजार वाढले आहेत.
Yavatmal News

Yavatmal News

esakal

Updated on

शिरजगावबंड: चांदूरबाजार-माधान मार्गे ब्राह्मणवाडा थडीदरम्यान नव्याने करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्यावर पाण्याचा योग्य वापर न झाल्यामुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. रस्ता तयार झाल्यानंतर नियमितपणे पाणी मारणे आवश्यक आहेच. शिवाय कच्च्या रस्त्यावरसुद्धा नियमित पाणी मारणे आवश्यक असून सुद्धा संबंधित यंत्रणेकडून याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. परिणामी, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून वाहनचालकांसह पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com