दरदेवश्वर संस्थानातील कार्तिकस्वामी मंदिराचे मठाधीपती महंत दुर्वासा महाराज भारती यांचे निधन

टीम ई सकाळ
Saturday, 23 January 2021

खाजगी दवाखान्यात उपचार पण घेतले. परंतु, शनिवारी दुपारी २.०५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यू समयी त्यांचे वय ९९ वर्षे होते.

महागाव (जि. यवतमाळ) : महागाव तालुक्यातील ईजनी येथील विदर्भातील एकमेव असलेले दरदेवश्वर संस्थानातील कार्तिकस्वामी मंदिराचे महंत दुर्वास महाराज भारती गुरू मनोहर भारती यांचे शनिवारी दुपारी निधन झाले आहे.

त्यांचा जन्म औरंगाबाद येथील आहे. चाळीस वर्षांपासून ते संस्थांनाचे कारभार पाहत होते. त्यांचे गुरू कै. मनोहर महाराज यांच्याकडून गुरुदीक्षा घेऊन मंहत गादीवर विराजमान झाले होते. त्यांचा महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटकपर्यंत भक्तगण व चाहता वर्ग आहे. जवळपास एक महिण्यापासून त्यांची प्रकृती खालवली होती.

खाजगी दवाखान्यात उपचार पण घेतले. परंतु, शनिवारी दुपारी २.०५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यू समयी त्यांचे वय ९९ वर्षे होते. त्यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम रविवारी (२४ जानेवारी) सकाळी १० वाजता ठरविला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahant Durvasa Maharaj Bharti passed away