
Amravati Airport First Flight: विदर्भातील महत्वाचं शहर तसंच देशातील ऑरेंज सिटी अशी ओळख असलेल्या अमरावतीकरांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. कारण आज अमरावती विमानतळाचं आणि प्रवासी विमान सेवेचं लोकार्पण करण्यात आलं. शहरातील विमानतळावर पहिल्यांदाच विमान उतरलं. त्यामुळं आता अमरावतीवरुन देशांतर्गत मोठ्या शहरांमध्ये विमानानं प्रवास करता येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यामंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मुंबईहून विमानानं प्रवास करत अमरावतीत लँडिंग केलं.