

गडचिरोली - राज्याच्या अर्थसंकल्पात गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या असून जिल्ह्याला ‘स्टील हब’ म्हणून विकसित करण्यासाठी ५०० कोटी रुपयांच्या खनिकर्म महामार्ग प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे.
याशिवाय आरमोरी येथे रेशीम कोष खरेदी-विक्री बाजारपेठ स्थापन केली जाणार आहे. तसेच दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत गडचिरोलीसाठी २१, ८३० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले असून त्यातून ७, ५०० नवीन रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे.
विदर्भातील विमानतळ विकासाच्या दृष्टीनेही या अर्थसंकल्पात विशेष तरतुदी करण्यात आल्या असून गडचिरोलीत नवीन विमानतळाच्या सर्वेक्षण आणि अन्वेषणाची कामे सुरू झाली आहेत.
गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या या घोषणांमुळे जिल्ह्यात उद्योग, वाहतूक आणि रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.