Maharashtra Cold Wave
esakal
Severe cold grips Maharashtra as minimum temperatures drop sharply : राज्यात थंडीचा कडाका वाढला असून किमान तापमानात सातत्याने घट होते आहे. अनेक ठिकाणी पारा १० अंशाच्याही खाली आहे. महत्त्वाचे म्हणजे आज तापमानात आणखी घट होण्याची शक्यता असून हवेत गारठा कायम राहील, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. इतकंच नाही, तर राज्यात पावसाप्रमाणेच थंडीचाही मुक्काम वाढणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे.