Amravati: राज्याचे पोलिस महासंचालक आज अमरावतीत; दोन महत्त्वाच्या बैठकांचे आयोजन
DGP Sadanand Date to Visit Amravati: राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते सोमवारी अमरावती दौऱ्यावर येणार असून पोलिस आयुक्तालय आणि विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयात महत्त्वाच्या प्रशासकीय बैठका घेणार आहेत.
अमरावती: राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते सोमवारी (ता. आठ) एक दिवसाच्या अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांच्या शहरात दोन स्वतंत्र बैठका होतील. दौऱ्यासाठी दाते हे रविवारी (ता.सात) रात्री उशिरा शहरात दाखल होणार आहेत.