223 शेतकरी आहेत तणावात, हे आहे कारण...

सायराबानो अहमद 
शुक्रवार, 20 मार्च 2020

धामणगाव रेल्वे (जि. अमरावती) : शेती व्यवसाय हा बेभरवशाचा झाल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक कणा मोडल्या गेला आहे. अनेक शेतकरी कुटुंबीय पतपुरवठा करणाऱ्या संस्था तसेच खासगी सावकारांचे कर्जबाजारी झाले आहेत. सततचा दुष्काळ, पीक उत्पादन घेणे मुश्‍किल झाले आहे, अशा परिस्थितीत कुटुंबप्रमुख तणावात जीवन जगत आहेत. अशा कुटुंबीयांचा प्रेरणा प्रकल्पांतर्गत सर्वे करण्यात आला. त्यामध्ये तालुक्‍यातील 223 कुटुंबप्रमुख तणावपूर्ण आयुष्य जगत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यातील 157 शेतकरी सौम्य, 48 मध्यम तर 18 शेतकरी तीव्र तणावग्रस्त आहेत. 

धामणगाव 26 हजार 849 कुटुंबीयांचा सर्वे करण्यात आला. त्यामध्ये 14 हजार 55 शेतकरी कुटुंबीयांचा समावेश आहे. धामणगाव तालुक्‍यातील तळेगाव दशासर, अंजनसिंगी, मंगरुळ दस्तगीर व निंबोली या 4 प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत या कुटुंबप्रमुखांचा शोध घेण्यासाठी आशा वर्कर्सच्या माध्यमातून 26 हजार 849 कुटुंबीयांची भेट घेऊन सर्वे करण्यात आला. 14 हजार 55 शेतकरी कुटुंबाचा यात समावेश आहे. यापैकी 18 कुटुंबप्रमुख तणावात आयुष्य जगत आहेत. 157 सौम्य आणि 48 मध्यम स्वरूपातील तणावात आहेत.

14 हजार 55 शेतकरी कुटुंबीयांचा सर्वे 
शासनाने आशा प्रेरणा प्रकल्प शेतकरी मानसिक समुपदेशन कार्यक्रमाअंतर्गत आशा वर्कर्सच्या माध्यमातून हा सर्वे करण्यात आला. तळेगाव दशासर, अंजनसिंगी, मंगरुळ दस्तगीर व निंबोली या चार प्राथमिक आरोग्य केंद्रातील 27 हजार 292 घरांमधील 26 हजार 849 कुटुंबांपैकी शेतकरी मानसिक समुपदेशन कार्यक्रमांतर्गत संशयित शेतकरी कुटुंबीयांची संख्या 2850 आहे. यामध्ये मानसिक आजाराचे वर्गीकरण केल्यानंतर सौम्य स्वरुपातील 158, मध्यम 48, तीव्र 18 शेतकऱ्यांचा समावेश आहे. या तीव्र असलेल्या काही शेतकऱ्यांवर मानसोपचार तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत व समुपदेशन करत आहेत. 104 या हेल्पलाईनवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळाले आहे.

हॅलो, सर तुमचे केवायसी करायचे आहे, ओटीपी सांगा... मग

त्याचप्रमाणे तळेगाव दशासर केंद्रात सौम्य 23, मध्यम 12, तीव्र 6 असे शेतकरी आहेत. अंजनसिंगी सौम्य 73, मध्यम 27, तीव्र 8 आहेत. मंगरुळ दस्तगीर केंद्रात तीव्र निरंक तर मध्यम 1, सौम्य 29 आहेत. निंबोली प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत सौम्य 32, मध्यम 8, तीव्र 4 शेतकरी आहेत. तणावाचे रूपांतर आत्महत्येमध्ये होऊ नये यासाठी शासन मानसोपचार तज्ज्ञ समुपदेशन करीत आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra farmers in tence situation