esakal | 'केंद्र सरकारची महाराष्ट्राला सर्वाधिक मदत; राज्य सरकारचे आरोप चुकीचे' : देवेंद्र फडणवीस

बोलून बातमी शोधा

null
'केंद्र सरकारची महाराष्ट्राला सर्वाधिक मदत; राज्य सरकारचे आरोप चुकीचे' : देवेंद्र फडणवीस
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती ः कोरोना प्रादुर्भावाच्या काळात केंद्र सरकार राज्याला मदत करीत नाही, असे आरोप चुकीचे असून, केंद्रानेच या काळात महाराष्ट्राला व्हॅक्‍सिन संदर्भात सर्वाधिक मदत केली. असे मत माजी मुख्यमंत्री व राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीत व्यक्त केले.

हेही वाचा: रक्षकच बनले भक्षक! चक्क डॉक्टरनेच लपवला रेमडेसिव्हिरचा साठा; चंद्रपुरातील धक्कादायक प्रकार

फडणवीस गुरुवारी (ता. 29) अमरावती दौऱ्यावर आले. त्यांनी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला भेट दिली. येथे त्यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह कोविड रुग्णालयाच्या डॉक्‍टरांसोबत एका बैठकीत चर्चा केली. बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. अमरावतीच्या परिस्थितीसंदर्भात त्यांनी येथील रुग्णांची वाढती परिस्थिती लक्षात घेता, ऑक्‍सिजन आणि औषधोपचाराची परिस्थिती नेक टू नेक असल्याचे सांगितले. रेमेडेसिव्हिरचा पुरवठा आणि व्हॅक्‍सिनेशनची येथे कमतरता आहे. समप्रमाणात व्हॅक्‍सिनेशन करण्याची गरज आहे.

त्यासंदर्भात ड्राईव्ह घेऊन मुख्यमंत्र्यासमोर हे सर्व विषय मांडल्या जातील. व्हॅक्‍सिनेशन कुठे कमी किंवा कुठे जास्त असे न करता, समप्रमाणात ते काम व्हावे. अमरावतीच्या कोविड रुग्णालयातील डॉक्‍टर सव्वा वर्षांपासून सातत्याने मेहनत घेत आहेत. त्याबद्दल त्यांनी येथील डॉक्‍टरांचे कौतुक केले. देशात कोव्हॅक्‍सिन आणि कोविशिल्ड लसीचे उत्पादन वाढते आहे. त्यामुळे 18 ते 45 वर्षे वयोगटातील लोकांना सहजतेने व्हॅक्‍सिन येत्या काळात मिळेल. असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. येत्या काळात उत्पादन वाढविणे गरजेचे आहे. त्यानंतर नव्वद कोटी लोकांचे व्हॅक्‍सिनेशन शक्‍य होईल.

कारण कच्च्यामालाचा पुरवठा करण्यासंदर्भात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. एवढेच नव्हे तर, मदतीचा साठाही पाठविला. त्यामुळे राज्यातील परिस्थितीत निश्‍चित सुधारणा होईल. असा विश्‍वास श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला. अमरावती दौऱ्यात त्यांच्यासोबत माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार रवी राणा, माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, भाजप प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी, जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी उपस्थित होते. यानंतर त्यांनी श्री. फडणवीस यांनी विभागीय आयुक्तालयात जाऊन विभागातील परिस्थितीचा आढावा घेतला.

हेही वाचा: मरणापेक्षा मासे महत्त्वाचे; गडचिरोलीतील मासळी बाजारात खरेदीसाठी तुफान गर्दी

परमजीतसिग संदर्भात भाष्य टाळले

मुंबईचे आयुक्त परमजीतसिंग यांच्याविरुद्ध अकोल्यात गुन्हा दाखल झाला. त्यासंदर्भात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले असता, याबाबतची माहिती घेतल्या जाईल. असे सांगून फडणवीस यांनी अधिक भाष्य करण्याचे टाळले.

संपादन - अथर्व महांकाळ