Maharashtra GPR Portal Down
esakal
अमरावती : राज्य शासनाच्या नवीन जीपीआर पोर्टलमध्ये निर्माण झालेल्या गंभीर तांत्रिक अडचणींमुळे राज्यभरातील आपले सरकार व महा-ई-सेवा केंद्रांचे ऑनलाइन कामकाज मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. नवीन साईट सुरू करण्यात आल्यानंतर पोर्टल लॉगिन न होणे, सर्वर एरर, अर्ज प्रक्रिया अर्धवट राहणे, संथगतीने सेवा चालणे तसेच वारंवार तांत्रिक अडथळे निर्माण होत असल्याने विद्यार्थी व सेवा केंद्र चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.