कर्मचाऱ्यांनो! वसुली करा अन्यथा पगार नाही; जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून तंबी

maharashtra jeevan pradhikaran warn employees in anjangaon surji of amravati
maharashtra jeevan pradhikaran warn employees in anjangaon surji of amravati

अंजनगावसुर्जी (अमरावती ) : अंजनगावसुर्जी, दर्यापूर, अकोट व भातकुली तालुक्‍यातील काही गावे अशा एकूण 235 गावांना शहानूर पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, जलव्यवस्थापन करताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला अंजनगाव व सुर्जी या जुळ्या शहरातील वाढत्या थकबाकीमुळे व्यवस्थापन करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना वसुली करा, अन्यथा पगार नाही, अशी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तंबी दिली गेली असल्याचे समजते.

अंजनगावसुर्जी शहरात एकूण 9352 नळग्राहकांची संख्या असून त्यात घरगुती 9250, व्यावसायिक 127 तर संस्थानचे 75, असा समावेश आहे. शहानूर पाणीपुरवठा योजनेतून एक दिवसाआड मुबलक पाणीपुरवठा ग्राहकांना केला जातो. उन्हाळ्यात संपूर्ण राज्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न ज्वलंत होत असताना येथे मात्र शहानूर धरण नागरिकांसाठी जीवनदायी ठरते. याही दिवसात मुबलक पाणी नसले तरी आवश्‍यक पाणी सर्व ग्राहकांना मिळते. 38 कोटींची थकबाकी या भागातील ग्राहकांकडे झाली असून लाखो रुपये बिल झाले असताना ग्राहक त्यातील काही रक्कमसुद्धा भरायला तयार होत नाही. शिवाय दर महिन्याला नियमित बिल भरणाऱ्या ग्राहकांची संख्यासुद्धा फारच कमी आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या वाढत्या थकबाकीबाबत चिंता व्यक्त केली असून यावर काही कृती न झाल्यास योजनेचे व्यवस्थापन करण्यात अडचणी निर्माण होत असल्याने त्यांनी स्थानिक कामकाज करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वसुली वाढवा, अन्यथा तुमच्या पगारावर गदा येईल, अशा सूचना दिल्या. तेव्हा येत्या महिन्यात शहरात सक्तीची वसुली सुरू होणार असल्याची माहिती मिळाली असून पथकनिहाय हा वसुलीचा कार्यक्रम राबविला जाणार आहे.

ग्राहकांनी बिल भरून सहकार्य करावे -
दिवसेंदिवस थकबाकी वाढत आहे. त्यामुळे वरिष्ठांकडून प्रत्येक सभेत याबाबत जाब विचारला जातो. आता तर आमच्या पगारावर गदा येण्याची वेळ आली आहे. त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांनी जाणीव ठेवून आपल्याकडील बिल भरून प्राधिकरणाला सहकार्य करावे, असे अवाहन उपविभागीय अभियंता विजय शेंडे यांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com