
यवतमाळ : घाटंजी व पुसद तालुक्यात वीज पडून एकाचा मृत्यू झाला. घाटंजी तालुक्यातील कोच्ची येथे वीज कोसळून शेतकरी शालिक कवडू अक्कलवार (वय ५८) यांचा मृत्यू झाला. ही घटना १५ ऑगस्ट रोजी दुपारी घडली. शालिक अक्कलवार शेती व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.