वनसर्वेक्षणात महाराष्ट्रच पहिलं प्यारा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 जानेवारी 2020

017 च्या अहवालानुसार, कांदळवन क्षेत्र 304 चौ. कि. मी. होते. ते 2019 मध्ये 320 चौ. कि. मी. झालेले आहे. राज्याच्या कांदळवन क्षेत्रात मागील दोन वर्षांत एकूण 16 चौ. कि. मी. ने वाढ झाली आहे. ही वाढ मागील अहवालापेक्षा 1.14 टक्के आहे.

नागपूर : राज्याच्या वनाच्छादन क्षेत्रात 95.56 चौरस किलोमीटरची वाढ झाली आहे. ही वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत 0.19 टक्के आहे. वनेतर क्षेत्रात वृक्षआवरणात भारतात महाराष्ट्राने पहिला क्रमांक मिळविला आहे. भारतीय वनसर्वेक्षण अहवालानुसार राज्याचे एकूण वनाच्छादन क्षेत्र 50 हजार 778 चौरस किलोमीटर एवढे झाले आहे. 2017 मध्ये 50,682 चौरस किलोमीटर एवढे होते. त्या तुलनेत यंदा वाढ झालेली आहे.

हे वाचाच - सुरू होेते जाम पे जाम; पळता पळता फुटला घाम

2017 च्या अहवालानुसार, कांदळवन क्षेत्र 304 चौ. कि. मी. होते. ते 2019 मध्ये 320 चौ. कि. मी. झालेले आहे. राज्याच्या कांदळवन क्षेत्रात मागील दोन वर्षांत एकूण 16 चौ. कि. मी. ने वाढ झाली आहे. ही वाढ मागील अहवालापेक्षा 1.14 टक्के आहे. कांदळवन क्षेत्रामध्ये भारतात गुजरातनंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात रायगड, मुंबई उपनगर, ठाणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रामुख्याने कांदळवन क्षेत्राची वाढ झालेली आहे. कांदळवन क्षेत्राची पुनर्निर्मिती व संगोपनासाठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्यात आली. तसेच मनुष्यबळ व संसाधने उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळेच समुद्रकिनारी राहणाऱ्या लोकांच्या उपजीविकेसाठी विशेष योजना कार्यान्वित करण्यात आली. परिणामी, कांदळवन क्षेत्राचे चांगले संवर्धन झाले. परिणामत: कांदळवन क्षेत्रात वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे.
राज्याच्या अतिघनदाट वनाच्छादनमध्ये 15 चौ. कि. मी. ने घट झाली आहे. मध्यम घनदाट वनाच्छादनमध्ये 60 चौ. कि. मी. ने घट झाली आहे. खुले वनाच्छादनमध्ये 119 चौ. कि. मी. ची वाढ झाली आहे. वनाच्छादन क्षेत्रातील वरील वाढ आणि घट कोणत्या ठिकाणी व कोणत्या कारणास्तव झाली आहे, याकरिता भारतीय वनसर्वेक्षण विभागाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर निश्‍चित करता येणार आहे.
भारतीय वनस्थिती अहवाल 2019 नुसार महाराष्ट्रात 440.51 दशलक्ष टन कार्बनसाठा आहे. देशात महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. या अहवालानुसार घनदाट बांबू क्षेत्रात महाराष्ट्र राज्य हे देशात अग्रगण्य आहे. तर, एकूण बांबूप्रवण क्षेत्रात महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. वनेतर क्षेत्रामध्ये 2017 च्या अहवालानुसार वृक्षआवरण हे 9,831 चौ. कि. मी. एवढे होते. 2019 च्या अहवालानुसार वृक्षआवरण 10,806 चौ. कि. मी. आहे. वनेतर क्षेत्रामध्ये 971 चौ. कि. मी. एवढी वाढ झाली आहे. वनेतर क्षेत्रात वृक्षआवरणात महाराष्ट्राने देशात पहिला क्रमांक पटकाविला आहे.

परंपरा कायम

वनेतर क्षेत्रातील वृक्षआवरणात महाराष्ट्र राज्याने अव्वल राहण्याची परंपरा कायम ठेवली आहे. हवामान बदलामुळे होणाऱ्या दुष्परिणामाची तीव्रता कमी करण्यासाठी वनेतर क्षेत्रावर वृक्षआवरण वाढविणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असे मत प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. के. राव यांनी व्यक्त केले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra is no. one