
वर्धा : साऱ्या नात्यांपेक्षा मैत्रीचे नाते हे श्रेष्ठ असल्याचे सांगण्यात आले. तशा अनेक घटना इतिहासात नोंद आहे. यात कृष्ण सुदामासह अनेक घटना आहेत. असाच काहीसा प्रकार वर्ध्यात घडला. कधी घराशेजारी राहणारा बालमित्र वर्धा येथे राहत असल्याची माहिती मिळताच महसूलमंत्री थेट आपला ताफा घेऊन त्याच्या घरी पोहोचले. या मित्राचे नाव चंद्रकांत मोहोड असून ते पिपरी येथील रहिवासी आहे. यावेळी महसूलमंत्र्यांसह जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर उपस्थित होते.