RTO Employee Strike
esakal
अमरावती : राज्यातील मोटार वाहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांवर शासनाने ठोस निर्णय न घेतल्याने महाराष्ट्र राज्य मोटार वाहन विभागातील कर्मचारी संघटनांनी दोन जूनपासून आंदोलनाचे अस्त्र हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेने परिवहन आयुक्तांसोबत पत्रव्यवहार करून दोन व नऊ जून आणि १६ जूनपासून आंदोलनाची घोषणा केली आहे.