
अमरावती : राज्यातील शाळेंच्या रचनेत ३० वर्षांनी मोठा बदल करण्यात आला आहे. प्रत्येक जिल्ह्यात असलेल्या केंद्र शाळा आता ‘समूह साधन केंद्र’, या नावाने ओळखल्या जाणार आहेत. केंद्रप्रमुख या पदाला समूह साधन केंद्र समन्वयक, असे नाव देण्यात आले आहे. तसेच राज्यभरातील ४ हजार ८६० समूह साधन केंद्रांची पुनर्रचना करण्यास मान्यता देण्यात आली आहे.