

Sahyadri Tiger Reserve
sakal
नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्प तसेच आसपासच्या परिसरातून वाघांना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात हलविण्यास पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने एकूण आठ वाघांचे स्थलांतर करण्यात येणार आहे.