Maharashtra weather update,
esaka
Vidarbha witnesses retreat of cold wave as temperatures rise in Nagpur : विदर्भातील थंडीची लाट ओसरल्याने गेल्या दोन दिवसांपासून शहरात गुलाबी थंडीचा फिल जाणवत आहे. हवेतील गारठा कमी झाल्याने रविवारी नागपूरचा पारा १५ अंशांच्या वर गेला. तर चंद्रपूर हे १८ अंशांसह विदर्भातील सर्वात ‘हॉट’ शहर ठरले. तापमानातील चढउतार पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचे प्रादेशिक हवामान विभागातर्फे सांगण्यात येत आहे.