Rare Case of Dextrocardia Successfully Operated in Maharashtra, Giving New Life to 51-Year-Old Woman : वर्धा जिल्ह्याती़ल सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय संचालित शालिनीताई मेघे सुपरस्पेशालिटी सेंटर येथे एका स्त्री रुग्णावर अत्यंत दुर्मिळ आणि जटिल अशा 'लाखात एक" असणाऱ्या "उलट्या काळजावर" शस्त्रक्रिया करण्याचे आव्हान हृदय शल्यचिकित्सकांसमोर उभे झाले आणि या तज्ज्ञांनी हे आव्हान स्वीकारत व अनुभव पणाला लावत महिलेला नवजीवन देण्यात यश मिळविले.