बापूंचे सेवाग्राम आश्रम जागतिक वारशात नाहीच! मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन सध्या हवेतच

sevagram ashram
sevagram ashrame sakal

वर्धा : सेवाग्राम आश्रमाचा समावेश जागतिक वारसा स्थळात करण्यात यावा, ही मागणी बहार नेचर फाउंडेशनने यापूर्वी केंद्र व राज्य शासनाकडे केलेली होती. महात्मा गांधी जयंतीदिनी आयोजित सेवाग्राम आराखड्याअंतर्गत कामांच्या ई-लोकार्पण समारोहात जागतिक वारसा स्थळातील समावेशासाठी प्रयत्न केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती. मात्र, यासंदर्भात अद्यापही नामांकन प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आलेला नाही.

sevagram ashram
नागपूरकरांनो सावधान! बाहेर फिरलात तर होणार कोरोना टेस्ट; १८ बाधित विलगीकरणात रवाना

जागतिक वारसा स्थळांची नियमावली युनेस्कोद्वारे तयार केली जाते. ज्या स्थळाचा समावेश जागतिक वारसा स्थळात करावयाचा आहे, त्याचे आधी नामांकन मिळवावे लागते. ही नामांकनाची फाईल भारत सरकार युनेस्कोकडे पाठविते. राज्य सरकारदेखील ही फाईल तयार करून केंद्र सरकारला सादर करू शकते. परंतु, या संदर्भात सध्या कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. सेवाग्रामचा समावेश जागतिक वारसास्थळात करण्यात यावा, ही मागणी बहारने दोन वर्षांपूर्वी पंतप्रधानांना पत्र पाठवून केली होती. याशिवाय, बहारतर्फे वारसा ते वारसा अशी सेवाग्राम आश्रम ते लोणार सरोवर सायकल यात्रा फेब्रुवारी २०२० मध्ये काढली होती. विशेष म्हणजे, लोणार सरोवराचा समावेश जागतिक वारसा स्थळात नुकताच करण्यात आला आहे. जागतिक वारसा यादीत नामांकन मिळणे ही प्रत्येक देशासाठी अभिमानाची बाब असते. त्या वारसास्थळाचे जागतिक महत्त्व या निमित्ताने अधोरेखित होत असते. अनेक आंतरराष्ट्रीय पर्यटक अशा स्थळांना भेटी देतात. त्यामुळे वर्धेकरांना आता सेवाग्राम आश्रमाच्या समावेशाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे ही नामांकन प्रक्रिया शासनाने लवकरात लवकर पुढे न्यावी, अशी मागणी बहार नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. किशोर वानखडे, उपाध्यक्ष आर्कि. रवींद्र पाटील, सचिव दिलीप वीरखडे, सहसचिव राहुल तेलरांधे, कोषाध्यक्ष डॉ. बाबाजी घेवडे, सदस्य संजय इंगळे तिगावकर, डॉ. जयंत वाघ, जयंत सबाने, दीपक गुढेकर, पराग दांडगे, वैभव देशमुख, स्नेहल कुबडे आदींनी जागतिक वारसा दिनानिमित्त केली आहे.

sevagram ashram
यवतमाळच्या अभियंत्याने साकारले बहुपयोगी ‘व्हेंटीलेटर’; भारत सरकारच्या नोडल एजन्सींची मान्यता

नामांकनाची फाईल तयार करणे हे अतिशय क्‍लिष्ट -

नामांकनाची फाईल तयार करणे हे अतिशय क्‍लिष्ट व व्यापक स्वरूपाचे काम असून वारसास्थळाच्या सीमा, त्याचे निकष, मालकी वर्णन, समग्र इतिहास, त्यात आतापावेतो झालेले बदल, नकाशा, संभाव्य वारसा स्थळाच्या वैश्विक मूल्याची पुराव्यासकट मांडणी आदी बाबींचा समावेश असतो. सोबतच आत्तापर्यंत घोषित करण्यात आलेल्या इतर स्थळांशी तुलना करून तसे तौलनिक विश्‍लेषण सादर करावे लागते. ही व्यापक प्रक्रिया असून त्या विषयातील तज्ज्ञांकडून ती पुढे नेणे सोयीचे असते. त्यामुळे राज्य शासनाने सेवाग्राम जागतिक वारसास्थळ नामांकन फाईल समिती स्थापन करावी, अशी मागणी बहारतर्फे करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com