esakal | महाविकास आघाडीचे सरकार हे लुटारुंचे सरकार
sakal

बोलून बातमी शोधा

Prakash-Ambedkar

संघटित टोळ्यांसोबत ‘वंचित’चा लढा असल्याचे सांगत वंचित बहूजन आघाडीचे नेते ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांना लुटारूंची उपमा दिली.

महाविकास आघाडीचे सरकार हे लुटारुंचे सरकार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : राज्यातील शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार हे लुटारुंचे सरकार आहे. या संघटित टोळ्यांसोबत वंचित बहुजन आघाडीच्या लढा असल्याचे भाष्य ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी अकोला येथे वंचितच्या मेळाव्यात केले.


केंद्र व राज्य सरकारवर वंचित बहुजन आघाडीचे नेते आंबेडकर यांनी शरसंधान साधताना सध्या लुटारुंसारखी सत्ताधाऱ्यांची टोळी असून, मोदींसह अनेकांकडून असे खेळ सुरू असल्याची टिका केली. विधानसभा निवडणुकीच्या निकालीची वाटणीच केली असून, लवकरच उद्धव ठाकरेंचा पोपट होईल, असा टोलाही त्यांनी लगावला. 

हेही वाचा - दुधात पडली महागाईची माशी

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसनेही ईव्हीएम विरोधात आंदोलन केले. मात्र आता ते ईव्हीएमला विरोध करणार नाही. आता तेच सत्ताधारी असून, ही मशिन त्यांच्या ताब्यात आहेत, याची त्यांना जाणीव असल्याचे आंबेडकर म्हणाले. ईव्हीएमचा खेळ काँग्रेसच्या काळापासून सुरू आहे. त्यांनी निडणुकीत अनेकांना पाडण्यासाठी त्याचा वापर केला. भाजपच्या हे लक्षात आल्यानंतर सत्तेत येताच त्यांनी मशिनचा वापर स्वत: जिंकण्यासाठी केला. ईव्हीएम असेपर्यंत आपण लोकसभा निवडणुकीत विजयी होण्याची अपेक्षा सोडून, द्या असेही त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटले. हैदराबाद युवती जळीत प्रकरणात वेगळेच रहस्य दडले असल्याचा दावा करताना ॲड. आंबेडकर यांनी पीडीतेने ती काम करीत असलेल्या सरकारी विभागातील गैरप्रकारांची पोलखोल केल्यानेच तिला संपविण्यात आले. त्यामुळे विरोधात जाल, तर या देशात जिवंत राहू शकत नाही, असे प्रकार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. 

loading image