

Mahavitaran Announces 50000 Rupees Compensation for Cow Bull and Buffalo Deaths in Power Line Accidents Across Maharashtra
sakal
नांदुरा: महावितरणच्या विद्युत वाहिन्या, विद्युत उपकरणे अथवा अन्य विद्युत यंत्रणेमुळे झालेल्या अपघातात पशुधनाचा मृत्यू झाल्यास शेतकरी आणि पशुपालकांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईच्या रक्कमेत भरीव वाढ करण्यात आली आहे. नव्या निर्णयानुसार गाय, म्हैस, बैल, घोडा, गाढव यांसारख्या मोठ्या जनावरांचा वीज अपघातात मृत्यू झाल्यास आता ५० हजार रुपये तर शेळी, मेंढी आणि वासरांसाठी ५ हजार रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे.