Washim Accident: मालेगाव जवळील अपघातात दोन तरुण ठार
Luxury Bus Crash: मालेगावजवळ शनिवारी रात्री राष्ट्रीय महामार्गावर घडलेल्या भीषण अपघातात मध्यप्रदेशातील दोन तरुणांचा मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगरहून आपल्या गावी परतणाऱ्या या तरुणांच्या मोटारसायकलला भरधाव लक्झरी बसने जोरदार धडक दिली.
मालेगाव (जि. वाशीम) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३-सी वरील मालेगाव येथील मुंदडा कृषी बाजाराजवळ शनिवारी (ता.२५) च्या रात्री झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.