Bike Accident: नागपूर संभाजीनगर महामार्गावर दुचाकींची भीषण टक्कर; दोन दुचाकींच्या धडकेत तीन ठार, एक जखमी
Accident News: जउळका येथील चैत्रबन धाब्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर वाशीम जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मालेगाव : नागपूर संभाजीनगर महामार्गावर जउळका येथील चैत्रबन धाब्याजवळ गुरुवारी(ता. ३०) च्या दुपारी दोन दुचाकी समोरसमोर धडकल्याने तिघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.