esakal | अधिक मासाची पूजा बेतली जीवावर, बापलेकांचा नदीत बुडून मृत्यू

बोलून बातमी शोधा

man and his son died due to drowning in river in amravati}

पूजेचे साहित्य सोडल्यावर मुलगा आर्यन व अमोल गोळे हे नदीच्या काठावरच आंघोळ करीत होते. मात्र, मुलाचा पाय घसरल्याने तो पाण्यात बुडायला लागला. त्यामुळे वडिलांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही.

अधिक मासाची पूजा बेतली जीवावर, बापलेकांचा नदीत बुडून मृत्यू
sakal_logo
By
सुरेंद्र चापोरकर

असदपूर (जि. अमरावती): जिल्ह्यातील निंभारी गावाजवळ सापन नदीत बुडून बापलेकाचा मृत्यू झाला आहे. अधिक मासाच्या पूजेचे साहित्य शिरवायला गेले असता मंगळवारी(ता. २९)दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

हेही वाचा - कोरोना काळातही विद्यार्थ्यांना आधार नोंदणीची सक्ती, सरकारचा अजब कारभार

आर्यन अमोल गोळे (वय 13) आणि अमोल ऊर्फ बबलू रमेश गोळे, अशी मृत बापलेकांची नावे असून दोघेही कोल्हा येथील रहिवासी होते. अमोल गोळे हे मुलगा आर्यन व कुटुंबातील सदस्यांसोबत अधिक मास असल्याने पूजेचे साहित्य शिरविण्यासाठी निंभारी येथून वाहणाऱ्या सापन नदीवर गेले होते. पूजेचे साहित्य सोडल्यावर मुलगा आर्यन व अमोल गोळे हे नदीच्या काठावरच आंघोळ करीत होते. मात्र, मुलाचा पाय घसरल्याने तो पाण्यात बुडायला लागला. त्यामुळे वडिलांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. शिवाय तेथेच भलामोठा खड्डा असल्याने त्यात दोघेही बुडायला लागले. कुटुंबातील महिलांनी आरडाओरड केली. मात्र, तेथे कुणीच नसल्याने त्यांना मदत मिळाली नाही व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. 

हेही वाचा - आंदोलनाचा बसला विद्यार्थ्यांना फटका, परीक्षा ढकलल्या पुढे

गोळे यांच्या कुटुंबातील महिलांनी घटनेची माहिती निंभारी येथील नागरिकांना दिली. तेव्हा घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली होती. लागलीच आसेगावपूर्णा पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यावरून ठाणेदारांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने गोळे पितापुत्रांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. पंचनामा करून मृतदेहांना अचलपूर येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. एकाच वेळी बापलेकाचा मृत्यू झाल्याने गोळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुढील तपास ठाणेदारांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.