
आपल्या मुलीवर अत्याचार झाल्याचे कळताच बलिकेच्या आईने शनिवारी, (ता. २३) वणी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच ठाणेदार वैभव जाधव यांनी आरोपीस अटक करण्यासाठी पथक पाठवले.
वणी (जि. यवतमाळ) : शहरातील खडबडा परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर शेजारी राहणाऱ्या ३५ वर्षीय इसमाने अत्याचार केला. या घटनेतील आरोपीला अवघ्या दोन तासांत अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहराच्या शेवटच्या टोकाला खडबडा परिसर आहे. या परिसरात राहणारी १५ वर्षीय बालिका घरी एकटी होती. बलिकेच्या घरा शेजारी राहत असलेल्या हनुमान बालजी राऊत (वय ३५) याने घरी कोणी नसल्याचे पाहून शुक्रवारी (ता. २२) दुपारच्या सुमारास जबरदस्तीने ओढत आपल्या घरात नेले व आतून दार लावून तिच्यावर अत्याचार केला.
कुटुंबीय घरी आल्यावर त्यांना मुलगी घरी दिसली नसल्याने त्यांनी चौकशी केली असता बालिका हनुमान यांचे घरी असल्याचे कळले. बलिकेच्या आईने आरोपीला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. बलिकेला विश्वासात घेऊन आईने विचारणा केली असता बलिकेने घडलेली हकीकत सांगितली.
आपल्या मुलीवर अत्याचार झाल्याचे कळताच बलिकेच्या आईने शनिवारी, (ता. २३) वणी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच ठाणेदार वैभव जाधव यांनी आरोपीस अटक करण्यासाठी पथक पाठवले. यावेळी आरोपी फरार होण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला मारेगाव येथून ताब्यात घेऊन अत्याचाराचा गुन्हा नोंद केला आहे.
संपादन - नीलेश डाखोरे