esakal | बापरे! अटक टाळण्यासाठी 'त्यानं' स्वतःच्या गळ्यावर केले वार; चोरली तब्बल २१ लाखांची रक्कम 
sakal

बोलून बातमी शोधा

विशाल मानेकर (वय 30, रा. जरीपटका, नागपूर), असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याचे नाव आहे. कळंब येथील 21 लाखांच्या लुटमार प्रकरणात पोलिसांना सायबर सेलकडून मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे सहा जण निष्पन्न झाले.

विशाल मानेकर (वय 30, रा. जरीपटका, नागपूर), असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याचे नाव आहे. कळंब येथील 21 लाखांच्या लुटमार प्रकरणात पोलिसांना सायबर सेलकडून मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे सहा जण निष्पन्न झाले.

बापरे! अटक टाळण्यासाठी 'त्यानं' स्वतःच्या गळ्यावर केले वार; चोरली तब्बल २१ लाखांची रक्कम 

sakal_logo
By
राजकुमार भितकर

यवतमाळ : कळंब येथील व्यापाऱ्याकडून 21 लाखांची रोकड उडविल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताने अटक टाळण्यासाठी स्वत:च्या गळ्यावर धारदार वस्तूने जखम करून घेतली. ही खळबळजनक घटना सोमवारी (ता.एक) दुपारी पाच वाजतादरम्यान पोलिस मुख्यालयात घडली.

विशाल मानेकर (वय 30, रा. जरीपटका, नागपूर), असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याचे नाव आहे. कळंब येथील 21 लाखांच्या लुटमार प्रकरणात पोलिसांना सायबर सेलकडून मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे सहा जण निष्पन्न झाले. त्यात संदीप अडबैले (वय 28, रा. सोनेगाव, जि. वर्धा), शुभम उर्फ केऱ्या डफ (वय 22, रा. हिंगणघाट), अक्षय जुमनाके (वय27, रा. मोहदा), विशाल मानेकर (वय 30, रा. नागपूर) यांना चार पथकाने नागपूर, हिंगणघाट, मोहदा परिसरातून दुपारी दोन व तीन वाजताच्या दरम्यान ताब्यात घेवून पोलिस मुख्यालयात आणले. 

हेही वाचा - "ओ मामी, बजेटवर एक रॅप साॅंग लवकर घेऊन या"; अमृता फडणवीस पुन्हा झाल्या ट्रोल 

त्यांच्यापैकी विशाल मानेकर याने शौचास जाण्याचा बहाणा केला. पोलिस त्याला घेवून शौचास गेले. पळून जाऊ नये म्हणून पोलिस कर्मचारी बाहेर थांबून त्याच्याशी संभाषण करू लागले. काही वेळात विशालच्या बोलण्याच्या आवाजात बदल झाल्याचे लक्षात आले. संशय आल्याने पोलिसांनी संडासात धाव घेतली असता, गळ्याला जखम झाल्याचे दिसले. त्याला उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. 

सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. या प्रकरणी मो. सलमान मो. शकील शेख (वय 30) यांनी अवधुतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान मंगळवारी (ता.दोन) अटकेतील तीन संशयितांना पुढील चौकशीसाठी कळंब पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. तिघांनाही न्यायालयापुढे हजर केले असता, पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

सराईत गुन्हेगाराची नोंद

विशाल मानेकर याच्याविरुद्घ नागपूर, वर्धा जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात घरफोडी, जबरी चोरी, दरोडा, शरीरविषयक गंभीर दुखापतीचे गुन्हे नोंद आहेत. पोलिसांत त्याची सराईत गुन्हेगार म्हणून नोंद आहे.

नक्की वाचा - राष्ट्रवादीच्या ट्विटने खळबळ; काँग्रेसवरच घेतला अन्याय होत असल्याचा संशय

पोलिसांना अडकविण्याचा प्रयत्न

स्वत:च्या हाताने गळ्यावर वार करून जखमी झालेल्या विशाल मानेकर याला वैद्यकीय महाविद्यालयात नेत असताना तू जखमी का करून घेतले, असे पोलिसांनी विचारले. चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक करू नये, पोलिसांना त्रास होईल व पोलिसांना अडकविण्यासाठी हा खटाटोप केल्याची कबुली दिली.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image