रोजगार मिळावा म्हणून विकली वडिलोपार्जित शेती.. पण पैसे देताच बाहेर आले धक्कादायक सत्य; नक्की काय घडले 

 सुरेंद्र चापोरकर  
Friday, 28 August 2020

संतोष प्रल्हाद चव्हाण (वय 44, रा. मंगरूळपीर, जि. वाशीम) व सचिन भाऊराव शिरसाट (वय 30, रा. मोगरा, जि. अमरावती), अशी फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अमरावती : विक्रीकर विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका बेरोजगार युवतीची दहा लाखांनी फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. प्रकरणी बडनेरा पोलिसांनी मंगरूळपीरसह अमरावती जिल्ह्यातील एक, अशा दोन ठगबाजांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

संतोष प्रल्हाद चव्हाण (वय 44, रा. मंगरूळपीर, जि. वाशीम) व सचिन भाऊराव शिरसाट (वय 30, रा. मोगरा, जि. अमरावती), अशी फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा - या प्रकल्पामुळे तब्बल २२ गावांच्या नागरिकांमध्ये आनंद; रोजगाराच्या संधीही वाढल्या

गुरुवारी (ता. 27) सायंकाळी बडनेरा ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला. पीडित बेरोजगार युवतीची भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रात जुलै 2019 मध्ये मंगरूळपीर येथील चव्हाण याच्यासोबत भेट झाली. त्याने व साथीदार शिरसाट याच्या मदतीने विक्रीकर विभागात चांगल्या पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून पीडित युवतीसह तिच्या पालकांचा विश्‍वास संपादन केला. 

त्यानंतर 25 जुलै 2029 ते 27 ऑगस्ट 2020 या कालावधीत युवतीच्या पालकांकडून आधी 6 लाख रुपयांची व त्यानंतर काही दिवसांतच 4 लाख रुपयांची रोकड, असे एकूण 10 लाख रुपये चव्हाण व शिरसाट यांनी घेतले. त्यावेळी युवतीसह तिचे नातेवाईक आणि काही मित्र उपस्थित होते.

पीडितेने दहा लाख रुपयांची रक्कम चव्हाणच्या बॅंक खात्यावर जमा केली. चव्हाण व शिरसाट यांनी दहा लाख घेऊनही युवतीस नोकरी लागली नाही. त्यामुळे पैशाची मागणी केली असता, दोघांनी टाळाटाळ केली. युवतीने बडनेरा ठाण्यात तक्रार केली असता आज (ता. 27) चव्हाण व शिरसाट विरुद्ध गुन्हा दाखल झाला.

क्लिक करा - हे काय! धावपटूंचे भविष्य धोक्यात; मातीगोट्यात करावा लागतो सराव.. मात्र काय आहे कारण

शेती विकून दिले नोकरीसाठी पैसे

आपल्या बेरोजगार मुलीला शासकीय नोकरी नक्की मिळेल, या विश्‍वासाने पित्याने वडिलोपार्जित शेती विकली. त्यातून मिळालेले दहा लाख रुपये ठगबाजांना दिले, असे पीडितेने बडनेरा ठाण्यात दाखल तक्रारीत म्हटले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: man did fraud with woman in the name of job