Train Accident : रेल्वेस्थानकावर पिण्याचे पाणी घेणे जिवावर बेतले; रेल्वेत चढताना भंडाऱ्याच्या एकाचा मृत्यू
Accident News : धामणगाव रेल्वेस्थानकावर पिण्याचे पाणी घेण्यासाठी उतरलेले ३८ वर्षीय प्रवासी अहमदाबाद-नवजीवन एक्स्प्रेसमध्ये चढताना घसरून पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे रेल्वेस्थानकावर मोठी खळबळ उडाली.
धामणगावरेल्वे : येथील रेल्वेस्थानकावर पिण्याचे पाणी घेण्यासाठी उतरलेल्या एका ३८ वर्षीय व्यक्तीचा चालत्या अहमदाबाद-नवजीवन एक्स्प्रेसमध्ये चढताना मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता.२७) सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली.