Buldhana News : तरुणाचे बनावट लग्न लावून पावणेतीन लाखांची फसवणूक; नवरीसह तिघे फरार, दोन आरोपी अटकेत
Buldhana Update : भालेगाव येथील तरुणाचे बनावट लग्न लावून सुमारे २.७५ लाखांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात दोन आरोपी अटकेत असून नवरीसह तिघे फरार आहेत. अटकेतील आरोपींना ५ जूनपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
मलकापूर : तालुक्यातील भालेगाव येथील तरुणाची बनावट लग्न लावून पावणेतीन लाख रूपयांची फसवणूक करण्यात आली असून या प्रकरणी ग्रामीण पोलीसांनी २२ मे रोजी दोघांना अटक केली असून नवरीसह तीन जण फरार आहेत.