
हिंगणघाट पोलिस ठाण्यांतर्गत तरोडा येथील पारधी बेड्यावर ही घटना घडली. स्मिता सगुणाथ पवार असे मृताचे तर अमित चूंगदेव राऊत (वय 31) रा. तरोडा पारधी बेडा असे आरोपीचे नाव असून आरोपीला हिंगणघाट पोलिसांनी अटक केली आहे.
हिंगणघाट (जि. वर्धा) : पैशाच्या वादातून भाऊ आईला मारहाण करीत असल्याचे दिसताच भांडण सोडविण्यासाठी थोरली बहीण मध्ये पडली. यात संतापलेल्या भावाने बहिणीवर चाकूने वार केला. यात गंभीर जखमी होऊन बहिणीचा शनिवारी (ता. 27) मृत्यू झाला. या प्रकरणी भावावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंगणघाट पोलिस ठाण्यांतर्गत तरोडा येथील पारधी बेड्यावर ही घटना घडली. स्मिता सगुणाथ पवार असे मृताचे तर अमित चूंगदेव राऊत (वय 31) रा. तरोडा पारधी बेडा असे आरोपीचे नाव असून आरोपीला हिंगणघाट पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचा - प्रशासनाला दारुड्यांची किती चिंता! मद्य विक्रीचे दुकान...
तरोडा येथील पारधी बेड्यावर राहणाऱ्या अमित राऊत याचा पैशासाठी आपल्या आई सोबत वाद सुरू होता. या दरम्यान स्वतःच्या आईला अमित मारहाण करीत होता. याची माहिती अमितची थोरली बहीण स्मिता सगुणाथ पवार ही आईला का मारतोस म्हणून आपल्या भावाला अडवीत होती. यामुळे अमितने तिच्यावर चाकूने सपासप वार केले. यात स्मिता गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडली.
जखमी स्मिता पवारला उपचारासाठी म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले होत. मृतक स्मिता पवारच्या फिर्यादीवरून आरोपी अमित चुंगदेव राऊत विरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. रुग्णालयात उपचार करून घरी परत आल्यानंतर स्मिताची प्रकृती खालवल्याने ती भोवळ येऊन खाली कोसळली. यातच तिचा मृत्यू झाला.
हेही वाचा - चंद्रपुरात आदिवासी बांधवांचा उपोषणाचा इशारा; मनपानं क्रांतिवीर बिरसा मुंडांचा पुतळा हटवल्यामुळे...
यामुळे या प्रकरणात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला असून यातील आरोपी अमित राऊत यास याला हिंगणघाट पोलिसांनी अटक केलेली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक संपत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक पी. आर. पाटणकर यांनी केली.
संपादन - अथर्व महांकाळ