क्षणात कुटुंब उद्धवस्त! पत्नीची हत्या करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

Chandrapur Crime
Chandrapur Crimesakal

चंद्रपूर : पतीने विद्युत प्रवाहाच्या सहाय्याने पत्नीला ठार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो फसला. त्यामुळे संतापलेल्या पतीनं कुऱ्हाडीनं वार करून पत्नीची हत्या केली आहे. त्यानंतर पतीने देखील आत्महत्येचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी (Chandrapur Gondpipari) तालुक्यात घडली.

Chandrapur Crime
पुणे : धक्कादायक ! मुलानेच केली जन्मदात्या पित्याची निर्घृण हत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोंडपिंपरी तालुक्यातील भंगाराम तळोदी येथे आरोपी राजू बावणे (४२) व्यक्ती आपली पत्नी योगितासोबत राहतो. शनिवारी रात्री दोघांमध्ये वाद झाला आहे. त्यानंतर वादाचे रुपांतर हत्येत झाले. आरोपी राजूने सुरुवातीला विद्युत शॉक देऊन तिला ठार करण्याचा प्रयत्न केला. पण, तो फसला. त्यानंतर त्याने कुऱ्हाडीने योगिताच्या मानेवर वार केले. यामध्ये ती जागीच ठार झाली. त्यानंतर त्याने स्वतःला संपविण्याचा देखील प्रयत्न केला. पण, तो अपयशी ठरला. स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्याला सध्या गोंपिंपरी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या संपूर्ण घटनेचे नेमके कारण काय? हे अद्याप समजू शकले नाही. घटनेचा पुढील तपास गोंडपिंपरी पोलिस ठाण्याचे ठाणेदार जीवन राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com