Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात इसमाचा मृत्यू; मोहफुले वेचताना हल्ला, मृतदेह फरकटत नेऊन पायाचे लचके तोडलं अन्..

forest Department Response After Tiger Attack India: वाघाच्या हल्ल्यात इसमाचा मृत्यू; गावकऱ्यांचा वन विभागावर रोष
Tragedy in Bampevda: Tiger Mauls Man Gathering Moh Flowers

Tragedy in Bampevda: Tiger Mauls Man Gathering Moh Flowers

sakal

Updated on

साकोली(जि. भंडारा) : तालुक्यातील बांपेवाडा येथील जंगल परिसरात मोहफुले वेचण्यासाठी गेलेल्या इसमावर वाघाने हल्ला करून जागीच ठार केले. त्यानंतर घटनास्थळावरून अंदाजे एक किलोमीटरपर्यंत मृतदेह फरकटत नेऊन पायाचे लचके तोडले. मृताचे नाव वसंत गणपत मेश्राम (वय ५०) असे आहे. या घटनेवरून गावकरी व वन अधिकाऱ्यांमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता.नंतर माजी जि. प. सदस्य व भाजप राज्य कार्यकारणीचे सदस्य डॉ. नेपाल रंगारी यांच्या मध्यस्थीने प्रकरण मिटविण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com