Success Story: गायीच्या शेणापासून पणत्या, कुंड्या सबकुछ! सोलापूरच्या पांडुरंग कुळकर्णी यांचा आता अमरावतीत प्रयोग

man made things  From cow dung
man made things From cow dung
Updated on: 

अमरावती ः गोमातेचे काय महत्त्व आहे हे विविध प्रयोगातून स्पष्ट झाले आहे. त्यातच सोलापूर येथील पांडुरंग कुळकर्णी यांनी गायीच्या शेणापासून विविध वस्तू तयार करण्याचा उपक्रम सुरू केला असून गाय वाचली पाहिजे, यासाठी त्यांनी अमरावतीतदेखील आता प्रशिक्षण देण्यास निर्णय घेतला आहे.

श्री. कुळकर्णी हे गेल्या १२ ते १५ वर्षांपासून श्री. छत्रपती शिवाजी महाराज लोकविद्यापीठ कल्याणच्या अमरावती शाखेचे प्रमुख डॉ. मंगेश देशमुख यांच्या संपर्कात आहेत. सोलापूर येथे पांडुरंग कुळकर्णी यांनी केलेले प्रयोग पाहून डॉ. देशमुख यांनी त्यांना अमरावतीला आमंत्रित केले. येथे त्यांनी काही ठिकाणांची पाहणी करून गायीच्या शेणापासून विविध वस्तू तयार करण्यात आल्यास त्यातून अनेकांना रोजगार मिळेल तसेच गायसुद्धा वाचेल, असे मत पांडुरंग कुळकर्णी यांनी व्यक्त केले.

सद्यस्थितीत त्यांच्या माध्यमाने गायीच्या शेणात काळी माती तसेच चुना टाकून धूपबत्ती स्टॅण्ड, मोबाईल स्टॅण्ड, पणत्या, जपमाळा, शोपीस, जाडे लावण्यासाठी कुंड्या, गणपती मूर्ती, हॉटेल तसेच खानावळीत जाळण्यासाठी लागणारे लाकडाचे ब्लॉक, विटा असे अनेक साहित्य निर्माण करण्यात येते. हे सर्व साहित्य नैसर्गिक पद्धतीने तयार करण्यात येत असल्याने ते पर्यावरणासाठी तसेच नागरिकांच्या आरोग्यासाठीदेखील उत्तम असल्याचे श्री. कुळकर्णी यांनी सांगितले. 

मराठी विज्ञान परिषदेच्या अमरावती शाखेचे पदाधिकारी प्रा. प्रवीण गुल्हाने त्यांच्या सोबत होते. अमरावतीच्या नांदगावपेठ येथील एमआयडीसीच्या जवळ डॉ. मंगेश देशमुख यांची जागा असून त्याठिकाणी गायीच्या शेणापासून विविध वस्तू तयार करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केले जातील, असे श्री. गुल्हाने यांनी सांगितले.

गाय वाचवा अभियान

गाय ही केवळ एक प्राणी नाही. गोमुत्र तसेच शेणात अनेक गुणधर्म आहेत. त्यावर विविध ठिकाणी संशोधनसुद्धा झाले आहे. त्यातून अनेक निष्कर्ष निघाले असून गाय वाचली तरच तुम्ही आम्ही वाचू, असे पांडुरंग कुळकर्णी यांनी सांगितले.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com