ते दोघेही होते विवाहित!..आणि पुढे काय घडले ..वाचा सविस्तर  

संतोष ताकपिरे
Sunday, 9 August 2020

ती विवाहित अन् दोन मुलांची आई, तो सुद्धा विवाहित, तिला गाठून तो म्हणाला पतीला सोड, अन् तू बस माझीच हो, जन्मभर सांभाळ करतो, असे आमीष दाखवून त्याने विवाहितेचे दोन वर्षे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 

अमरावती : एखाद्या व्यक्तीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून हवी असेल ती गोष्ट त्या व्यक्तीकडून मिळवणे असे प्रकार आजकालच्या वाढतच चालले आहेत. एखाद्या महिलेला  लग्नाचे अमिष दाखवून फसवणूक करणे अशा घटना जिल्हयात वाढतच चालल्या आहेत. अशीच एक फसवणुकीची घटना अमरावती जिल्ह्यात घडली आहे.   

ती विवाहित अन् दोन मुलांची आई, तो सुद्धा विवाहित, तिला गाठून तो म्हणाला पतीला सोड, अन् तू बस माझीच हो, जन्मभर सांभाळ करतो, असे आमीष दाखवून त्याने विवाहितेचे दोन वर्षे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 

सविस्तर वाचा - प्रेमाखातर स्वीकारला मुस्लीम धर्म अन् झाली दोन मुलांची आई, तरीही प्रेम विवाहाचा करुण अंत

एकाच कंपनीत होते कामाला 

संदीप अशोक राजपूत (वय ३२, रा. धारणी) असे अत्याचाराचा गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पीडित विवाहिता व संदीप हे दोघेही एका कंपनीच्या प्रसार, प्रचार व विक्रीचे काम करीत होते. सोबत काम करीत असल्याने त्यांची जवळीक निर्माण झाल्याने त्यांच्यात चर्चाही रंगत होती. संदीपने तिच्यापुढे आपल्या मनातील भावना व्यक्त केली.

पतीला सोडून दे

दोघेही विवाहित असल्याची त्यांना पूर्वकल्पना होती. त्याने विवाहितेला पतीला सोडून दे, मी तुझा जीवनभर सांभाळ करतो. तू फक्त  माझीच हो, असे आमीष दाखवून सतत दोन वर्षापासून तिचे लैंगिक शोषण केले. असा आरोप पीडितेने धारणी ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीतून केला. 

शिवीगाळ करून जबर मारहाण

गुरुवारी (ता. सात) संदीपच्या आई आणि बहिणीने पीडितेच्या घरासमोर येऊन तिला शिवीगाळ करून जबर मारहाण केली. त्यात ती जखमी झाली. पीडितेने संदीपविरुद्ध लैंगिक शोषण केल्याची तक्रार धारणी ठाण्यात नोंदविली. विवाहितेने विरोधात तक्रार नोंदविल्याचे कळताच संदीप फरार झाला असे तपास अधिका-यांनी सांगितले.

जाणून घ्या - नोकराचा आला मालकिणीवर जीव; फोटोशूट करून केली भलतीच मागणी, आता...

या प्रकरणात कायद्यातील तरतुदीनुसार पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई केली. पिडीतेने केलेल्या आरोपाची चौकशी सुरू आहे.
- लहू मोहंदुळे, 
पोलिस निरीक्षक, धारणी ठाणे.

संपादन- अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: man misbehaves with woman in amaravati