esakal | अमरावती जिल्ह्यात युवकाने मित्राच्या पत्नीचा केला विनयभंग 
sakal

बोलून बातमी शोधा

man misbehaves with woman in amaravati

पत्नीने घेतलेल्या कर्जाची परतफेड शक्‍य नसल्याचे बघून मित्राच्या पत्नीकडे कर्ज देणाऱ्याने अश्‍लील चाळे करून थेट शरीरसुखाची मागणी केली. अंजनगावसुर्जी ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

अमरावती जिल्ह्यात युवकाने मित्राच्या पत्नीचा केला विनयभंग 

sakal_logo
By
गजेंद्र मंडलिक

अंजनगावसुर्जी (जि. अमरावती) ः देशात दिवसेंदिवस महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचं प्रमाण वाढतंच चाललं आहे. अल्पवयीन मुलींपासून तर महिलांपर्यंत कोणीही या देशात सुरक्षित नाहीत. असाच काहीसा प्रकार अमरावती जिल्ह्यातील अंजनगावसुर्जी इथे घडला आहे.  

पत्नीने घेतलेल्या कर्जाची परतफेड शक्‍य नसल्याचे बघून मित्राच्या पत्नीकडे कर्ज देणाऱ्याने अश्‍लील चाळे करून थेट शरीरसुखाची मागणी केली. अंजनगावसुर्जी ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

हेही वाचा - चला मुलांनो, सोमवारपासून शाळेत या! ऑनलाईन बैठकीत घेतला निर्णय

कुलदीप बोरोळे (वय 30), असे संशयित आरोपीचे नाव असल्याचे अंजनगावसुर्जी पोलिसांनी सांगितले. कुलदीपविरुद्ध अडवणूक, विनयभंगासह जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. कुलदीपच्या एका मित्राचे दुकान आहे. दोघेही परिचित होते. त्याचाच आधार घेत बोरोळे हा त्याच्या मित्राच्या गैरहजेरीत त्याच्या पत्नीला भेटण्याकरिता घरी जात होता. 

त्याने महिलेच्या पतीला दोन लाख रुपये कर्ज दिले होते, ते कर्ज पती फेडू शकत नाही, अशी बतावणी केली. त्यामुळे तिच्यापुढे मदत करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्याचाच आधार घेत नेहमी बोरोळे हा पतीच्या गैरहजेरीत अश्‍लील चाळेही करीत होता, असा आरोप पीडितेने तक्रारीत केला. घटनेच्या दिवशी पती बाहेरगावी गेल्यामुळे पीडित महिला ही दुकानात बसली असता, 

क्लिक करा - रात्र वैऱ्यांची! धानपिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांसह गावकऱ्यांचे ‘जागते रहो’

एकेठिकाणी जेवण असल्यामुळे तेथे चालण्याचा आग्रह कुलदीपने केला. पीडिता त्याच्यासोबत दुचाकीवर बसून गेली. कुलदीपने तिला एका घरात नेले. कुणीच नसल्याने पीडितेने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. पुन्हा त्याने पीडितेकडे शरीरसुखाची मागणी रेटून धरली. ओरडल्यास पतीला जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप पीडितेने अंजनगावसुर्जी ठाण्यात दाखल तक्रारीतून केल्याचे पोलिसांनी सांगितले.
 
संपादन - अथर्व महांकाळ